पांडुरंगा दयाघना गुणनिधाना भवसिंधू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:29 AM2018-01-31T00:29:38+5:302018-01-31T00:29:42+5:30

येथील बाहेरील नाथ मंदिरात ह.भ.प. छैया महाराज गोसावी, ह.भ.प. विनित महाराज गोसावी यांनी एकनाथी भागवत पारायण सप्ताह आयोजित केला होता. त्यानिमित्तानं संत एकनाथांचे तेरावे वंश पं.गिरीश गोसावी आणि पं. मिलिंद गोसावी यांचा अभंगवाणी कार्यक्रम आयोजित केला होता.

 Panduranga Parthana Compassion Bhavisindhu ... | पांडुरंगा दयाघना गुणनिधाना भवसिंधू...

पांडुरंगा दयाघना गुणनिधाना भवसिंधू...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : येथील बाहेरील नाथ मंदिरात ह.भ.प. छैया महाराज गोसावी, ह.भ.प. विनित महाराज गोसावी यांनी एकनाथी भागवत पारायण सप्ताह आयोजित केला होता. त्यानिमित्तानं संत एकनाथांचे तेरावे वंश पं.गिरीश गोसावी आणि पं. मिलिंद गोसावी यांचा अभंगवाणी कार्यक्रम आयोजित केला होता.
शास्त्रीय संगीताचा वारसा लाभलेले पंडितजी रंगमंचावर उपस्थित होऊन रागराज-यमन कल्याणवर आधारित ‘रामकृष्ण हरि’ चा गजर सुरू झाला. शास्त्रीय संगीतातील वेगवेगळे श्रवणीय घटक संयमित वापरून अतिशय रंजकपणे सादरीकरण झाले. एकनाथ महाराजांची समाधी असलेला परिसर आणि वारकºयांनी तुडूं’ब भरलेलं सभागृह आणि सुरेलपणे सादर झालेले ‘जय जय राम कृष्ण हरि’ मुळे वातावरण भक्तीमय झालं.
मिलिंद गोसावींनी किरवाणी रागात नाथांचा अभंय ‘पाहता समरचणाची शोभा। अवघा जगी विठ्ठल उभा’ घेतला, सुंदर रागविहार, छोट्या -छोट्या ताना, हरकतींनी अभंग सजवला. परंपरेनुसार रुपाचा अभंग घ्यावा लागतो, त्या नंतर पं.गिरीश गोसावींनी मिश्र मालकंस रागावर आधारित, संत एकनाथ रचित ‘भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा’ हा बोधपर अभंयग सादर केला. राग मालकंसासोबत, कौशी कानडा, चंद्रकंस अशा रागांच्या छटा त्यांनी कौश्ल्यपूर्ण घेतल्यामुळे अभंग अतिशय परिणामकारक झाला.
या अभंगानंतर पं. गिरीशजींनी ज्ञानदेवांच्या ‘वासुदेव’’ सादर केला. देसकार आणि भूप रागांच्या छटा असलेली ही रचना ‘घुळघुळा वाजती टाळ’’ असे शब्द घेवूृन सजली होती.
भारदस्त आवाज आणि आवाजातील चपळता यांचा सुरेख संगम असलेले पंडितजी ही रचना गातांना अधिक खुललेले जाणवले.
अशा भक्तीरसप्रधान वातावरणातच पंडितजींनी भैरवी राग छेडला. भैरवी रागात सर्व स्वरांचा वापर करण्याची मुभा शास्त्रानं दिलेली आहे. याचा फायदा घेत सर्व सूरांचा वापर करून भैरवीचं मूळ रूप प्रभावीपणे दाखवत सुंदर लयकारी आणि द्रुत धुमाळी तालात संत निळोबा महाराजांचा अभंग ‘‘पांडुरंगा दया घना।ऋणानिधाना भवसिंधू’’ सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. संयोजकांच्या हस्ते तबला वादक उदय नाईक मुंगीकर, हार्मोनियमची साथ देणारे गणेश अण्णासाहेब आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title:  Panduranga Parthana Compassion Bhavisindhu ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.