सीए संघटनेच्या अध्यक्षपदी पंकज सोनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:04 AM2021-02-26T04:04:17+5:302021-02-26T04:04:17+5:30
औरंगाबाद : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी पंकज सोनी यांनी, तर विद्यार्थी संघटना विकासाच्या अध्यक्षपदी ...
औरंगाबाद : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षपदी पंकज सोनी यांनी, तर विद्यार्थी संघटना विकासाच्या अध्यक्षपदी रूपाली बोथरा यांची निवड झाली आहे.
उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे, उपाध्यक्ष योगेश अग्रवाल, सचिव प्रवीण बांगड, कोषाध्यक्ष गणेश भालेराव, आरसीएम आणि शाखा नामांकित ( नॉमिनी) उमेश शर्मा, सदस्य गणेश शिलवंत, रोहन आचलिया यांचा समावेश आहे.
या संघटनेअंतर्गत शहरातील ९०० पेक्षा अधिक, तसेच संपूर्ण मराठवाड्यातील १५०० पेक्षा अधिक चार्टर्ड अकाऊंटंट सदस्य आहे.
आयसीएआयचे अध्यक्ष निहार जांभुसारिया आणि पश्चिम विभागाचे अध्यक्ष सीए मनीष गादीया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नवीन कार्यकारिणी परिस्थितीनुसार पुढील वर्षभर ऑनलाईन, ऑफलाईन, कार्यशाळा व परिषद आयोजित करण्यात येणार आहे. अध्यक्ष पंकज सोनी यांनी सांगितले की, भारतातील सीएचा अभ्यासक्रम जगात सर्वांत उच्च दर्जाचा आहे. यामुळे निकालात उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी कमी असते. अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमापेक्षा सीए अभ्यासक्रमाची फी खूप कमी आहे. या अभ्यासक्रमाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी संघटनेच्या वतीने उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयात चर्चासत्रे आयोजित केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
चौकट
पाच हजार विद्यार्थ्यांचा विकासा
सीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांची संघटना विकासाच्या अध्यक्षा रूपाली बोथरा यांनी सांगितले की, पाच हजार विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारी विकासा संघटना आहे. संघटनेतर्फे करिअर समुपदेशन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.