‘आमचं ठरलंय’ भूमिकेमुळे पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 02:33 PM2019-12-11T14:33:56+5:302019-12-11T14:37:48+5:30

राज्याचे नेतृत्व करण्याची संधी इतर पक्षांत मिळण्याची शक्यता कमी असल्याची कार्यकर्त्यांची भावना

Pankaja Munde's activists are confused by the 'we have decided' role | ‘आमचं ठरलंय’ भूमिकेमुळे पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते संभ्रमात

‘आमचं ठरलंय’ भूमिकेमुळे पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते संभ्रमात

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पंकजा मुंडे यांची भेट घेतली.जवळच्या कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधला असता पंकजा या पक्षांतर करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

औरंगाबाद : राज्यातील भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडेसमर्थक कार्यक़र्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र पंकजा मुंडे यांचे काही ठरले नसून त्या पक्षातच राहतील असा विश्वास त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी व्यकत केला. 

मुंबईत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यामुळे गोपीनाथ गडावर गुरुवारी (दि. १२) होणाऱ्या मेळाव्यात त्या कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, मुंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना काही संदेश आहे का, याचा कानोसा घेतला असता काही कार्यकर्त्यांनी त्या पक्षांतर करणार नाहीत, असा असा ठाम विश्वास व्यक्त केला.
पंकजा मुंडे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर राजकारण ढवळून निघाले आहे. याचदरम्यान पंकजा मुंडे यांनीही पक्षांतर करणे रक्तात नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही एकनाथ खडसे यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांच्या चाललेल्या बैठका, संवाद यामुळे पंकजा मुंडे या एकनाथ खडसे यांच्यासह पक्षांतर करण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. याविषयी औरंगाबाद आणि बीडमधील त्यांच्या जवळच्या कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधला असता पंकजा या पक्षांतर करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

औरंगाबादमधील एका समर्थकाने सांगितले की, सोशल मीडियावरील मोहिमेमुळे आम्हीही संभ्रमात आहोत. मात्र, पंकजा मुंडे पक्ष बदलाचा निर्णय घेतील, असे वाटत नाही. पक्षाचे एक नेते म्हणाले की, आमचा दुसरा तिसरा काही विचार नाही. पक्षात राहायचं असंच आमचं ठरलंय. 

पंकजांकडून दबाव टाकण्याचे राजकारण ?
बीडमधील त्यांच्या जवळचे एक़ नेते म्हणाले, पंकजा मुंडे यांना राज्याचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांच्याकडे नेतृत्व दिले जाणार नाही.  आ. आदित्य ठाकरे यांच्यामुळे भविष्यातही संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही नेतृत्वासाठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये पंकजा मुंडे एकरूप होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपशिवाय पंकजा मुंडे यांना पर्याय नसल्याचे त्यांच्या समर्थकांनी स्पष्ट केले. यामुळे पंकजा मुंडे पक्षांतर नव्हे, तर दबाव गटाचे राजकारण करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Pankaja Munde's activists are confused by the 'we have decided' role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.