पाणंदमुक्तीकडे पवारवाडीची वाटचाल
By Admin | Published: October 1, 2016 12:44 AM2016-10-01T00:44:52+5:302016-10-01T01:20:14+5:30
माजलगाव/गंगामसला : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील ग्रामस्थांनी पाणंदमुक्तीचा संकल्प केला असून, गावात यानिमित्ताने बैठका घेण्यात येत आहेत.
माजलगाव/गंगामसला : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील ग्रामस्थांनी पाणंदमुक्तीचा संकल्प केला असून, गावात यानिमित्ताने बैठका घेण्यात येत आहेत. उद्योजक अप्पासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका पार पडत आहेत.
पवारवाडी हे एक हजार लोकसंख्येचे गाव आहे, उघड्यावर शौचाला बसल्यामुळे साथरोग पसरतात, त्याचा ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. याबाबतची माहिती अप्पासाहेब जाधव सर्वांना बैठकीतून सांगत आहेत. पुढील सहा महिन्यांत गाव पाणंदमुक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले असता त्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत तात्काळ अंमलबजावणी केली जात आहे. बैठकीप्रसंगी सुनील खामकर, विजय धुमाळ, कंकलेश्वर धुमाळ, रामदास शेळके, सर्जेराव डिसले यांनी आपले विचार मांडले. शंकर चव्हाण, मुंजाबा जाधव, शिवाजी चव्हाण, संदीप डिसले, नवनाथ शेळके, सुखदेव धुमाळ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)