नाखलगावची पपई दिल्ली-कोलकाताच्या बाजारपेठेत; लाखोंची कमाई करत शेतकरी मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 12:30 PM2023-11-09T12:30:24+5:302023-11-09T12:30:51+5:30

पपईच्या बागेत वेलवर्गीय पीक म्हणून टरबुजाचे आंतरपीक या शेतकऱ्यांनी घेतले आहे.

Papaya from Nakhalgaon in Delhi-Kolkata markets; Farmers are earning millions | नाखलगावची पपई दिल्ली-कोलकाताच्या बाजारपेठेत; लाखोंची कमाई करत शेतकरी मालामाल

नाखलगावची पपई दिल्ली-कोलकाताच्या बाजारपेठेत; लाखोंची कमाई करत शेतकरी मालामाल

- संतोष स्वामी
दिंद्रुड:
पारंपरिक शेतीला छेद देत नाखलगावच्या शेतकऱ्याने पपई उत्पन्नातून लाखोंची कमाई केली आहे. उत्पादन उच्चदर्जाचे असल्याने मुंबई, नागपूरसह देशभरातील पंजाब, दिल्ली, कलकत्ताच्या बाजारपेठेत पपईची मागणी वाढल्याने शेतकरी मालामाल झाला आहे.

नाखलगाव येथील अमोल श्रीमंतराव शिनगारे,रामहारी विशिष्ट शिनगारे, राजेभाऊ  काशिनाथ शिनगारे या शेतकरी भावंडांनी सहा एकर पपईचे रोप फेब्रुवारी महिन्यात लावले. जवळपास सहा हजार रोपटे बार्शी येथून खरेदी केली.आठबायसहा फुटांवर रोप लागवड करत या शेतकऱ्याने मल्चिंग, ठिबक सिंचन, रासायनिक व सेंद्रिय खते, खुरपणी, शेत नीटनेटके, मजूरी आदीसाठी जवळपास चार लाख रुपये खर्चून मशागत केली.

आठ महिन्यानंतर पपईचा पहिला तोडा काढला. त्यावेळी ३२ रुपये किलो या होलसेल दराने नागपूर, मुंबईसह देशातील पंजाब, दिल्ली, कोलकाताच्या बाजारपेठेत पपईची निर्यात केली. जवळपास साडेसात लाख रुपयांची कमाई या शेतकऱ्याला मिळाली असून आठ ते नऊ लाख रुपये पुढील चार महिन्यात उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.

टरबुजाचे आंतरपीक

सदर पपईच्या बागेत वेलवर्गीय पीक म्हणून टरबुजाचे आंतरपीक या शेतकऱ्यांनी घेतले आहे. यातून सहा एकर लागवडीला सहा लाख रुपयांचे उत्पन्न या शेतकऱ्यांना मिळाले.  पिकाची लागवड सुलभ असल्याने आता भारतातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पपईची लागवड करण्यास सुरवात केली आहे. हे फळ जीवनसत्त्वे 'ए' आणि 'सी' चा चांगला स्रोत असल्याने स्वास्थ्यवर्धक गुणामुळे दैनंदिन आहाराचा एक भाग बनला असून मागणी वाढली आहे. 

Web Title: Papaya from Nakhalgaon in Delhi-Kolkata markets; Farmers are earning millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.