पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:14 AM2018-01-20T00:14:57+5:302018-01-20T00:15:24+5:30
औरंगाबाद : पुणे येथील कै. बाबूराव सनस मैदानावर ३ ते ४ फेब्रुवारीदरम्यान राज्यस्तरीय पॅरा (दिव्यांग) अॅथलेटिक्स स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यासाठी २१ जानेवारी रोजी सकाळी ८.३0 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स मैदानावर जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
औरंगाबाद : पुणे येथील कै. बाबूराव सनस मैदानावर ३ ते ४ फेब्रुवारीदरम्यान राज्यस्तरीय पॅरा (दिव्यांग) अॅथलेटिक्स स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यासाठी २१ जानेवारी रोजी सकाळी ८.३0 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अॅथलेटिक्स मैदानावर जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सतीश लोणेकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून गजानन सानप, भरत शहा, सुमित खांबेकर, राजेंद्र दोशी, तर बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देशराज देब्रा, नरेश नाथानी, गौतम नाथानी, प्रभूलाल पटेल असणार आहेत.
या स्पर्धेत फक्त दिव्यांग खेळाडूच सहभागी होऊ शकतील. ही स्पर्धा, १00 मी., २00 मी., ४00 मी. व ८00 मीटर धावणे, तसेच गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक या प्रकारात होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा पॅरा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष कमांडर विनोद नरवडे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक व सचिव डॉ. दयानंद कांबळे, कोषाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे आदी परिश्रम घेत आहेत.