कुसळंबचे खंडोबा देवस्थान भक्तांसाठी ठरणार नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:07 AM2017-09-18T00:07:54+5:302017-09-18T00:07:54+5:30

पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील तीर्थक्षेत्र खंडोबा देवस्थानचा विकास केला जात असून, यासाठी १ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी खर्च होत आहे.

 Paradise is existing for Khandoba Devasthan devotees | कुसळंबचे खंडोबा देवस्थान भक्तांसाठी ठरणार नंदनवन

कुसळंबचे खंडोबा देवस्थान भक्तांसाठी ठरणार नंदनवन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील तीर्थक्षेत्र खंडोबा देवस्थानचा विकास केला जात असून, यासाठी १ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी खर्च होत आहे. येथे येणाºया भाविकांसाठी निवासासह इतर सुविधा उपलब्ध आहेत, तसेच सभामंडप, शॉपिंग कॉम्प्लेक्सह परिसराचे सुशोभीकरण झाल्याने हे तीर्थक्षेत्र भक्तांसाठी नंदनवन ठरू पाहत आहे.
पाटोद्यापासून १६ कि.मी. अंतरावर कुसळंब हे ३१४० लोकसंख्येचे गाव. अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेसह इतर शासकीय कार्यालये यामुळे हे गाव नेहमीच चर्चेत असते. पंचक्रोशीतील भाविकांचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या दर्शनासाठी वर्षाकाठी ३ लाखांवर भाविक येतात. हे मंदिर पुरातन असून, बांधकाम हेमांडपंथी आहे. प्रत्येक रविवारी येथे २० हजारावर भाविक दर्शनासाठी येतात. तसेच चैत्र पौर्णिमा व चंपाषष्ठी अशा दोन वेळेस येथे यात्रा भरते. भाविकांची गर्दी पाहून भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी तीर्थक्षेत्र विकासासंदर्भात आवाज उठविला होता. त्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यापुढेही त्यांनी प्रस्ताव मांडला. पर्यटन विकास योजनेअंतर्गत परिसर विकासासाठी १ कोटी ३३ लाखांचा निधी मार्च २०१६-१७ मध्ये उपलब्ध झाला. तात्काळ कामाला सुरुवात झाली. सद्य:स्थितीत हे काम अंतिम टप्प्यात असून, वर्षाअखेरीस त्याचे लोकार्पण होईल, असा विश्वास पोकळे यांनी व्यक्त केला. जि.प. माजी सदस्य शिवनाथ पवार, ग्रा.पं. सदस्या आबासाहेब पवार, सरपंच राधाताई मधुकर पवार हे पाहणी करीत आहेत.

Web Title:  Paradise is existing for Khandoba Devasthan devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.