विठ्ठलपूर वनक्षेत्रात फुलणार नंदनवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:04 AM2021-07-10T04:04:02+5:302021-07-10T04:04:02+5:30
विठ्ठलपूर वनक्षेत्रातील जवळपास ९९ हेक्टर वनक्षेत्राचा ताबा इको बटालियनला देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वनविभाग व भारतीय संरक्षण विभागाच्या ...
विठ्ठलपूर वनक्षेत्रातील जवळपास ९९ हेक्टर वनक्षेत्राचा ताबा इको बटालियनला देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने
वनविभाग व भारतीय संरक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये लिंब, वड, पिंपळ, जांभूळ, सीताफळ, आंबा, आवळा, चिंच, मोह, पळस, बेल, सौंदड, शिसम अशा विविध प्रकारच्या प्रजातींची लागवड केली जाणार आहे. हा कार्यक्रम सत्यजित गुजर, वनसंरक्षक औरंगाबाद व कमांडिंग ऑफिसर एम. ए. खान १३६ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना) यांच्या प्रमुख उपस्थितीत व उपवनसंरक्षक एस. व्ही. मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) अण्णासाहेब पेहरकर, लेफ्टनंट कर्नल जयकर, कॅप्टन मेहता, सुभेदार मेजर गाडेकर, सुभेदार मेजर डुकिया, नायब सुभेदार तोडमल यांच्यासह वनपरिमंडळ अधिकारी प्रवीण कोळी, एस. पी. कादी, वनरक्षक एम. ए. शेख, संजीव माळी, नारायण ताठे, प्रवीण कांबळे, अमोल वाघमारे, एच. के. वाघ, विलास सपकाळ, एस. सी. मधे, सुवर्णा मगर, वनसेवक अशोक आव्हाड आदी उपस्थित होते.