समांतरचा फास सैल

By Admin | Published: July 14, 2015 12:41 AM2015-07-14T00:41:47+5:302015-07-14T00:41:47+5:30

औरंगाबाद : पाणी प्रश्नावर आयोजित महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कारभारावर सडकून टीका केली

Parallel phosas | समांतरचा फास सैल

समांतरचा फास सैल

googlenewsNext



औरंगाबाद : पाणी प्रश्नावर आयोजित महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कारभारावर सडकून टीका केली. तसेच आधी पाणी द्या, मगच नळांना मीटर बसवा, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. साडेसहा तास चाललेल्या सभेत सेनेच्या नगरसेवकांनीही भाजप नगरसेवकांच्या सुरात सूर मिसळत कंपनीच्या त्रासाचा पाढा वाचला. शेवटी महापौरांनी तूर्तास घरगुती नळांना मीटर बसवू नये, पाणीपट्टीची वसुली पूर्वीप्रमाणे मनपा कर्मचाऱ्यांकडूनच करण्यात यावी आणि नागरिकांना मीटर बाहेरून खरेदी करण्याची मुभा देण्यात यावी, असे आदेश दिले.
भाजप नगरसेवकांच्या मागणीवरून आज विस्कळीत पाणीपुरवठा आणि मीटरच्या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १०.३० वाजता सभेला सुरुवात झाली. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत उर्दू शायर बशर नवाज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समांतरचे कंत्राट घेतलेल्या वॉटर युटिलिटी कंपनीकडे शहराचा पाणीपुरवठा हस्तांतरित होऊन दहा महिने झाले. या काळात पाणीपुरवठा सुधारण्याऐवजी बिघडला आहे. सहा-सहा दिवस पाणी येत नाही. तक्रार केली तरी कंपनीचे अधिकारी दखल घेत नाहीत, अशी तक्रार बापू घडामोडे, राजू शिंदे, अब्दुल नाईकवाडी, कीर्ती शिंदे, अंकिता विधाते, माधुरी अदवंत,
वॉटर युटिलिटीकडून शहरात मीटरच्या नावाखाली नागरिकांची लूट सुरू आहे. लोकमतने गेल्या काही दिवसांपासून विविध वृत्तातून त्यावर प्रकाश टाकला. कंपनीचे मीटर पाण्याऐवजी हवेचेही रीडिंग दाखवीत असल्याचे आणि बाराशे रुपयांच्या मीटरसाठी ३६०० रुपये आकारले जात असल्याचेही लोकमतने समोर आणले.
४या वृत्ताच्या प्रती नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी झळकावल्या. तर नगरसेविका सत्यभामा शिंदे यांनी पाणी प्रश्नावरील आंदोलनाचे वृत्त असलेले अंक दाखवीत कंपनीने नगरसेवकांवर अशी वेळ आणल्याचा आरोप केला.
हवेवर फिरणाऱ्या मीटरचा सभागृहातच डेमो
वॉटर युटिलिटी कंपनीकडून शहरात नळांना बसविण्यात येणारे मीटर नुसत्या हवेवरही फिरत आहेत. नळाला पाणी येण्याआधी हवा आली तरी मीटरचे रीडिंग बदलत आहे. भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात याचे प्रात्यक्षिकच करून दाखविले. त्यासाठी सभागृहात मीटर आणण्यात आले होते. बापू घडामोडे, राज वानखेडे, राजू शिंदे यांनी या मीटरला जोडलेल्या नळाच्या पाईपमध्ये हवा फुकून दाखविली.
सभागृहात चर्चेदरम्यान सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला. त्याला एमआयएमच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यावर महापौरांनी त्यांना जे म्हणायचे ते म्हणू द्या, तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा असे म्हटले.
४त्यानंतर संतापलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांनी सभागृहात अल्लाहो अकबर, नारा ए तकदीरच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. हे पाहून मग सेनेच्या नगरसेवकांनीही जयभवानी जयशिवाजीच्या घोषणा सुरू केल्या. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झाला. महापौरांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर थोड्याच वेळात वातावरण निवळले.
पाणीपट्टी वसुली आणि मीटरबाबत महापौर आदेश देत असतानाच मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी त्यास आपल्या जागेवर उठून विरोध दर्शविला. समांतरचा करार करताना काही अटी मान्य करण्यात आल्या आहेत. सभागृहाने त्याला मान्यताही दिलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने निर्णय घेणे चुकीचे आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Parallel phosas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.