परभणीत अंगणवाडी कर्मचाºयांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:36 AM2017-09-12T00:36:41+5:302017-09-12T00:36:41+5:30

अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनने ११ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

Parbhani Anganwadi workers' fasting | परभणीत अंगणवाडी कर्मचाºयांचे उपोषण

परभणीत अंगणवाडी कर्मचाºयांचे उपोषण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनने ११ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
अंगणवाडी सेविकांना दरमाह ५ हजार तर मदतनिसांना दरमाह अडीच हजार रुपये असे तुटपुंजे मानधन दिले जाते. या मानधनात वाढ करण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाºयांना शासकीय दर्जा द्यावा आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात अ‍ॅड.माधुरी क्षीरसागर, अर्चना कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, रत्नमाला कदम, सीमा देशमुख, सुनिता भोळे, उषा भालेराव, अनुराधा थोरात, स्वाती जोशी, संध्या वाघमारे, वर्षा चव्हाण, आशा गजमल आदींसह युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Parbhani Anganwadi workers' fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.