परभणी जिल्ह्यात ३़३८ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:43 PM2017-08-30T23:43:49+5:302017-08-30T23:43:49+5:30
मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या पावसाची नोंद महसूल प्रशासनाने घेतली असून, सरासरी ३़३८ मिमी पाऊस झाला आहे़ आतापर्यंत ३८७ मिमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या पावसाची नोंद महसूल प्रशासनाने घेतली असून, सरासरी ३़३८ मिमी पाऊस झाला आहे़ आतापर्यंत ३८७ मिमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे़
यावर्षीच्या पावसाळी हंगामात दोन महिन्यांच्या खंडानंतर पावसाला प्रारंभ झाला होता़ मंगळवारी देखील जिल्ह्यात सर्वदूर रिमझिम पाऊस झाला़ दिवसभर झालेल्या या पावसाची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे़ त्यानुसार परभणी तालुक्यात ६़५० मिमी, गंगाखेड १़२५ मिमी, पालम २़३३ मिमी, पूर्णा ३़८० मिमी, पाथरी ४़३३ मिमी, मानवत ५़ ६७मिमी, सोनपेठ २ मिमी, सेलू २ आणि जिंतूर तालुक्यात २़५० मिमी पाऊस झाला आहे़ आतापर्यंत पावसाच्या टक्केवारीनुसार पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ९१ टक्के पाऊस झाला असून, सेलू तालुक्यामध्ये ८५़६२ टक्के, सोनपेठ तालुक्यात ७७ टक्के, मानवत तालुक्यात ७४ टक्के, परभणी ६८ टक्के, गंगाखेड ६५ टक्के आणि जिंतूर व पालम तालुक्यात प्रत्येकी ६१ टक्के पाऊस झाला आहे़ पाथरी तालुक्यात सर्वात कमी ४७ टक्के पाऊस झाला आहे़