परभणीत रिपाइंची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:56 PM2017-10-31T23:56:28+5:302017-10-31T23:56:35+5:30

धान्य घोटाळा प्रकरणात चौकशी अधिकारी आणि पुरवठा अधिकारी कायद्याचा गैरवापर करुन खºया आरोपींना कारवाईपासून दूर ठेवत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Parbhani Rippai demonstrations | परभणीत रिपाइंची निदर्शने

परभणीत रिपाइंची निदर्शने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :धान्य घोटाळा प्रकरणात चौकशी अधिकारी आणि पुरवठा अधिकारी कायद्याचा गैरवापर करुन खºया आरोपींना कारवाईपासून दूर ठेवत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
परभणी शहरातील शासकीय धान्य गोदामातून धान्य गायब झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २२ आरोपींना अटक केली असून १४ आरोपी अजूनही मोकाट आहेत. चौकशी अधिकारी आणि पुरवठा अधिकारी मूळ आरोपींना बाजुला ठेवून केवळ रेशन दुकाने रद्द करण्याचीच कारवाई करीत आहेत. याच्या निषेधार्थ रिपाइंने हे आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात रिपाइंचे राज्य सचिव लक्ष्मणराव बनसोडे, राज्य संघटक डी. एन.दाभाडे, मराठवाडा संघटक जयप्रकाश इंगोले, माधवराव हातागळे, धोंडीराम कदम, राजू कर्डिले, मनोहर सावंत, राणूबाई वायवळ, बाळू गायकवाड, छबुराव धापसे, टी.आर.डाके, अ‍ॅड. सुरेंद्र सूर्यवंशी, भगवान कांबळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Parbhani Rippai demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.