परभणीकरांच्या घशाला लाल फितीमुळे कोरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:35 PM2017-11-17T23:35:02+5:302017-11-17T23:35:55+5:30
शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाºया राहटी बंधाºयातील जलसाठा संपत आला असल्याची माहिती असूनही वेळेवर नियोजन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने व जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून तातडीने कारवाई झाली नसल्याने परभणीकरांच्या घशाला कोरड पडल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ लालफितीच्या कारभारामुळेच शहरवासियांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाºया राहटी बंधाºयातील जलसाठा संपत आला असल्याची माहिती असूनही वेळेवर नियोजन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने व जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून तातडीने कारवाई झाली नसल्याने परभणीकरांच्या घशाला कोरड पडल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ लालफितीच्या कारभारामुळेच शहरवासियांचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद आहे.
परभणी शहराला राहटी बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो. राहटीमध्ये येलदरी धरणातील पाणी सोडण्यात येते. दर दीड महिन्याला महानगरपालिका पूर्णा पाटबंधारे विभागाला या पाण्यापोटी पाच लाख रुपयांचा निधी देते. हे नियमित चक्र आहे. असे असतानाही वेळीच काळजी घेतली गेली नसल्याने शहरवासियांना १७, १८ व १९ नोव्हेंबर असे तीन दिवस निर्जळीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता प्रारंभी मनपाने या संदर्भात नियोजन वेळेत केले नसल्याचे दिसून आले. पाणीसाठा संपत आल्याची चाहूल लागल्यानंतर या विभागाच्या अधिकाºयांनी पूर्णा पाटबंधारे विभागाला पत्र देऊन बंधाºयात पाणी सोडण्याची मागणी केली पाहिजे. परंतु, तसे झाले नाही. १३ नोव्हेंबर रोजी मनपाने जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांना राहटीमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीचे पत्र दिले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी १४ नोव्हेंबर रोजी हे पत्र पूर्णा पाटबंधारे विभागाला पाठवून दिले. १५ नोव्हेंबर रोजी या विभागाचे वसमत येथील कार्यकारी अभियंता बी.एम.आंबेकर हे रजेवर असल्याने या विषयी निर्णय झाला नाही. १६ नोव्हेंबर रोजी आंबेकर यांनी या पत्रावर कारवाई करुन संबंधित अधिकाºयांना अलर्ट दिला व पाणी सोडण्याचे आदेश दिले. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातून राहटीमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. महानगरपालिका शहरात तीन दिवस निर्जळी असल्याचे सांगून मोकळी झाली. परंतु, प्रत्यक्षात मात्र शहरवासियांना तब्बल १० दिवसानंतर पाणी मिळते. त्यात पुन्हा तीन दिवस वाढले. ज्या तीन दिवसांमध्ये शहराच्या संबंधित भागात पाणीपुरवठा होणार होता. त्याचे रोटेशन पुढे ढकलले गेले. त्यामुळे ही प्रक्रिया नियमित होण्यासाठी अधिकचे दोन दिवस लागू शकतात. त्यामुळे जवळपास १५ दिवसानंतर शहराच्या अनेक विभागांना पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरवासियांनामधून संताप व्यक्त केला जात आहे. अधिकाºयांचा नियोजनशून्य कारभार आणि कागदी घोडे नाचविण्याची प्रक्रिया यामुळेच हिवाळ्यात शहरवासियांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे शहरवासियांना १५ दिवसाला पाणी मिळणार असले तरी यावर मनपातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्य मूग गिळून बसले आहेत.