पुत्रवियोगाच्या धक्क्याने माता-पित्याचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:02 AM2021-04-25T04:02:21+5:302021-04-25T04:02:21+5:30

नवले कुटुंबावर एकामागून एक आघात : दोन तासात दोघांनीही सोडला प्राण औरंगाबाद : कुटुंबातील सर्वांत लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा ...

Parents also die due to miscarriage | पुत्रवियोगाच्या धक्क्याने माता-पित्याचाही मृत्यू

पुत्रवियोगाच्या धक्क्याने माता-पित्याचाही मृत्यू

googlenewsNext

नवले कुटुंबावर एकामागून एक आघात

: दोन तासात दोघांनीही सोडला प्राण

औरंगाबाद : कुटुंबातील सर्वांत लाडक्या मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आई-वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेत दिवंगत प्रा. डॉ. संजय नवले यांचे वडील माणिकराव व आई मंदाकिनी हे मृत्यू पावले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागातील प्रा. डॉ. संजय माणिकराव नवले (वय ५५) यांचे १५ एप्रिल रोजी उपचार सुरू असताना औरंगाबादेत निधन झाले. मुळचे चोराखळी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील ते रहिवासी होत.

त्यांच्यावर याच दिवशी उस्मानाबादेत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थित असलेल्या आई-वडिलांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना पुण्यातील बोरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे वडील माजी शिक्षण अधिकारी माणिकराव तात्याबा नवले (८०) यांचे शुक्रवारी सायकांळी ५ वाजता निधन झाले, तर अवघ्या दोन तासांतच आई मंदाकिनी माणिकराव नवले (वय ७८) यांनीही प्राण सोडला. उपचार सुरू असतानाच दोघांचीही प्राणज्योत मालवली.

या दाम्पत्यावर शनिवारी सकाळी धनकवडी, पुणे येथील महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात प्रा. अरविंद (शिवाजी महाविद्यालय, उदगीर) व सुनील (पुणे) ही दोन मुले, मुलगी व नातवंडे, असा परिवार आहे. या घटनेचे वृत्त समजताच चोराखळी गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, डॉ. संजय नवले यांच्या पाठोपाठ आई-वडिलांचेही निधन झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आम्ही सर्वजण या दुःखात सहभागी आहोत, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नवले कुटुंबीयास पाठविलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Web Title: Parents also die due to miscarriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.