आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:02 AM2021-07-12T04:02:07+5:302021-07-12T04:02:07+5:30
मोफत शिक्षण - प्रतिसाद का नाही त्याची कारणमिमांसा करा, आरटीई पालक संघाची मागणी योगेश पायघन औरंगाबाद : आरटीईतून ...
मोफत शिक्षण - प्रतिसाद का नाही त्याची कारणमिमांसा करा, आरटीई पालक संघाची मागणी
योगेश पायघन
औरंगाबाद : आरटीईतून प्रवेशासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या ११ जूनपासून आतापर्यंत केवळ १,९४२ प्रवेश निश्चित झाले. हे प्रमाण केवळ ५३ टक्के आहे. तर १,२८२ पाल्यांचे तात्पुरते प्रवेश झाले असून अद्याप ४०१ पालकांनी प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद दिलेला नाही. त्यांना २३ जुलैपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ६०३ शाळांत ३,६२५ आरटीई जागांसाठी ३,४७० विद्यार्थ्यांची सोडतीतून निवड करण्यात आली. त्यासाठी पालकांना ११ ते ३० जून पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चिती करायची होती. त्याला पहिल्यांदा ९ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली त्यानंतर आता २३ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ १,९४२ प्रवेश निश्चित झाले. तर १,२८२ पाल्यांचे तात्पुरते प्रवेश झाले. आतापर्यंत केवळ १,९४२ प्रवेश निश्चित झाले. तर १,२८२ पाल्यांचे तात्पुरते प्रवेश झाले. पालकांनी शाळेत जाऊन लवकर प्रवेश निश्चिती करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
शाळा चालकांकडून शासन परिपूर्ती देत नाही म्हणून पालकांची अडवणूक करुन शुल्काची मागणी केली जाते. आर्थिक दृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना गरज असताना प्रतिसाद का मिळत नाही. त्यामागची कारणे शोधण्याची गरज असून आरटीई प्रवेश प्रक्रियेला गतिमान करा. शाळांकडून पालकांची होणारी अडवणूक थांबवण्याची मागणी आरटीई पालक संघाने केली आहे.
---
दुसऱ्यांदा मुदतवाढ
--
आरटीई प्रवेश निश्चितीची प्रक्रिया ११ जूनपासून सुरु झाली. त्यासाठी सुरुवातीला २० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र, त्यात पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ९ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली होती. तरीही प्रवेश पूृर्ण न झाल्याने आता २३ जुलैपर्यंत पालकांना शाळेत जाऊन प्रवेश निश्चितीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
----
आरटीई परतावा शासन कधी देणार ?
---
आरटीई प्रवेश विद्यार्थ्यांना देत आहेत. मात्र, कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शाळांचे हक्काचे आरटीईच्या परताव्याचे पैसे शासनाने तत्काळ द्यायला पाहिजे. शाळा चालवणे अवघड झाले असून मनुष्यबळाचे वेतन करण्यातही अडचणी येत आहे. शासनाने शाळांच्या अडचणीही समजून घ्याव्या.
-प्रल्हाद शिंदे-मेसा इंग्रजी शाळा संघटना
----
पालकांच्या अडचणी काय ?
--
पहिल्या २० दिवसात केवळ ७१७ प्रवेश झाले. दुसऱ्यांदा मिळालेल्या मुदतवाढीत पालकांनीही शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करुन घ्यावा. पालक का प्रतिसाद देत नाहीत. याची कारणे शिक्षण विभागाने शोधली पाहिजे. शासन वेळेवर आरटीईचा परतावा देत नाही हे सत्य असले तरी शाळांकडून पालकांची अडवणूक योग्य नाही. यासंदर्भात निदर्शने, निवेदने देऊन पालकांच्या हक्कासाठी लढत आहोत.
-प्रशांत साठे, अध्यक्ष, आरटीई पालक संघ
---
सातारा परिसरातील शाळेत माझ्या पाल्यासह सहा जणांचा लाॅटरीत नंबर लागला. शाळेत प्रवेशाला गेलो. तर तिथे शाळा बंद होती. संस्थाचालकाला संपर्क केला तर त्यांनी शाळा सध्या बंद केली असल्याचे सांगितले. आता प्रवेश कुठे करायचे म्हणून शिक्षण विभागात खेटे मारत आहोत.
-अस्लम शेख पालक
---
शाळांनी टाळाटाळ करु नये
--
आरटीई प्रवेशाला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. शाळांंनी पालकांची कुठल्याही प्रकारे अडवणूक, टाळाटाळ करु नये. तर पालकांनीही सहकार्य करावे. निवड झालेल्या पाल्यांच्या पालकांना बोलावून त्यांची प्रवेश निश्चिती गतीने पूर्ण करुन घ्यावी अशा सूचना शाळांनाही दिल्या आहेत.
पालकांनीही प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद द्यावा.
-डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद
----