वाळूज एमआयडीसीत रस्ते बनले पार्किंग झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:16 PM2018-12-11T23:16:29+5:302018-12-11T23:16:43+5:30
वाळूज उद्योगनगरीत मुख्य व अंतर्गत रस्ते पार्किंग झोन बनली आहेत.
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत मुख्य व अंतर्गत रस्ते पार्किंग झोन बनली आहेत. या वाहनांमुळे वाहतूक कोंडीसह अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहनधारक व पादचाऱ्यांना या वाहनांच्या रांगेतून मार्गक्रमण करताना जीव धोक्यात घालावा लागत आहे.
वाळूज उद्योग नगरीत कच्चा व पक्या मालाची ने आण करणाºया जड वाहनाबरोबरच लोकल वाहतूक करणाºया वाहनाची सारखी ये-जा सुरु असते. बहुतांशी कारखान्याकडे स्वत:ची पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे अवजड वाहने कपंनीसमोरील रस्त्यावरच दोन-तीन दिवस उभे राहतात. येथील कामगार चौकालगत जड वाहनांसाठी एमआयडीसीने पार्किंची व्यवस्था केली आहे.
पण पैशाची बचत करण्यासाठी अनेक वाहनधारक मुख्य चौक व रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे उद्योगनगरीतील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. वाहने रस्त्यावरच उभी रहात असल्याने रहादारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. या वाहनांकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.