सोशल मीडियावरून संसद सचिव निवडणुकीचा प्रचार
By Admin | Published: September 13, 2014 11:02 PM2014-09-13T23:02:30+5:302014-09-13T23:13:44+5:30
सोमनाथ खताळ , बीड महाविद्यालयातील संसद सचिव पदासाठीच्या निवडणुका अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्या आहेत.
सोमनाथ खताळ , बीड
महाविद्यालयातील संसद सचिव पदासाठीच्या निवडणुका अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संसद सचिव पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी निवडून येण्यासाठी प्रचार गतीमान केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचाराला अधिक गती दिल्याचे चित्र बीडमध्ये दिसून येत आहे़ सोबतच वर्गप्रतिनिधींशी संपर्कही वाढविण्यावर भर देण्यात आला आहे़
सोमवारी संसद सचिवांच्या पदासाठी सकाळी ११.३० ते दुपारी १ च्या दरम्यान मतदान प्रक्रिया चालणार आहे. जस जशा निवडणुका जवळ येतील तसतसा उमेदवारांनी प्रचार गतीमान केला आहे. या निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवारांनी सोशल मिडीयाचाही आधार घेतला आहे. फेसबुक, व्हॉट्स अॅप, टिष्ट्वटर, संदेश आदींच्या माध्यमातून उमेदवार आपला प्रचार करीत आहेत. मोबाईल, इंटरनेटची सुविधा झाल्याने सध्याची तरूणाई सोशल मिडीयाशी जोडलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आणि वेगाने प्रचार करण्यासाठी सध्या सोशल मिडीया उमेदवारांसाठी फायद्याचा ठरत आहे. अनेक उमेदवारांनी आपण असे काम करू? चळवळ उभी करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभा करू ? यासारखे आश्वासने देत फेसबुकवर विविध ‘पोस्ट’ टाकल्या आहेत. व्हॉट्सअॅपवरही विविध संदेश आकले जात असून नवे ‘ग्रुप’ बनविण्यात उमेदवारांनी अधिक पसंती दिली आहे.
मार्गदर्शन करण्यासाठी हात सरसावले
बलभीम महाविद्यालयातील निवडणूक रंगतदार ठरू शकते, असा अंदाज काढला जात आहे. कारण मागील चार ते पाच वर्षापासून येथील संसद सचिवाची निवड बिनविरोध झाली होती़ यावर्षी निवडणुकीचा निकाला कसा लागेल, हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचा उत्साह वाढला आहे़