'पोपट उडाला भूर,पोरगा अडकला'; पोपटासाठी झाडावर गेलेल्या मुलाची झाली दैना

By विकास राऊत | Published: March 24, 2023 12:34 PM2023-03-24T12:34:39+5:302023-03-24T12:34:51+5:30

१४ वर्षीय मुलगा सायंकाळी पोपट पकडण्यासाठी एका ३० फूट उंचीच्या झाडावर चढला अन अडकून बसला

Parrot flew brown, boy got stuck on tree at Chhatrapati Sambhajinagar, rescued by fire brigade | 'पोपट उडाला भूर,पोरगा अडकला'; पोपटासाठी झाडावर गेलेल्या मुलाची झाली दैना

'पोपट उडाला भूर,पोरगा अडकला'; पोपटासाठी झाडावर गेलेल्या मुलाची झाली दैना

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : पोपट पकडण्यासाठी झाडावर जाऊन अडकलेल्या मुलास अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तास परिश्रम घेऊन खाली आणले. हर्सूल भागात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. हा मुलगा दोन तास झाडावर अडकून पडला होता.

हर्सूल पोलिस स्टेशन परिसरात मनोज कुमार हा १४ वर्षीय मुलगा गुरुवारी सायंकाळी पोपट पकडण्यासाठी एका ३० फूट उंचीच्या झाडावर चढला होता. पोपटाचे घर असलेल्या लाकडाच्या ढोलीत त्याने हात घातला. त्यात हात अडकला. हात निघत नसल्याने त्याने आरडाओरड करताच नागरिक जमा झाले. त्यांनी अग्निशमन विभागाला पाचारण केले.

अग्निशमन विभागाचे अधिकारी विजय राठोड, जवान कृष्णा होळंबे, रमेश सोनवणे, योगेश दुधे, रामेश्वर बमणे, राजू ताठे, वाहन चालक योगेश दुधे यांनी धाव घेतली. त्यांनी परिश्रमपूर्वक मनोजला खाली आणले.

Web Title: Parrot flew brown, boy got stuck on tree at Chhatrapati Sambhajinagar, rescued by fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.