परतूर, सेवलीत पावसाचे पुनरागमन, पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 12:41 AM2016-08-25T00:41:40+5:302016-08-25T00:53:51+5:30
परतूर: परतूर शहरासह तालुक्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वच पिकांना जीवदान मिळाले. मागील महिनाभरापासून दडी मारली
परतूर: परतूर शहरासह तालुक्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वच पिकांना जीवदान मिळाले.
मागील महिनाभरापासून दडी मारली यामुळे सर्वच पिक पाण्याला आली होती. तर काही भागात पिक माना टाकू लागली. सध्या सोयाबीनला शेंगा लागत आहेत. मुग, उडीद पिकाच्या शेंगा भरत आहेत. कपाशीला फूल पाते लागत आहे. पिक परिस्थिती यावर्षी उत्तम आहे. मात्र, महिनाभरापासून पाऊसच नसल्याने पिक माना टाकू लागले व शेतकरी हवालदिल झाले होते. निरभ्र आकाश व कडक पडणारे उन यामुळे पिकाबरोबरच जनावरांचा चाराही सूकत होता मागील चार पाच दिवसापासून पुन्हा पावसाही वातावरण होऊन अधूनमधून काही भागात हलकासा पाऊस पडत आहे. २४ आॅगस्ट रोजी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने सर्वच पिकांना जीवदान मिळाले.
हा पाऊस परतर शहर, परीसर, बामणी, सोयंजना, वरफळ, आनंदवाडी, वरफळवाडी, मसला आदी भागात या पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा ंिमळाला आहे. मात्र, सर्वत्र पिकांना आणखी पावसाची गरज आहे. (वार्ताहर)
सेवलीस एक महिन्याच्या विश्रांतीनंतर अर्धातास चांगला पाऊस पडल्याने वाळुन, सुकुन चाललेले सोयाबीन पिकाला जीवदान मिळाले व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. एक महिना पावसाने उघडीप दिल्याने हाता तोंडाशी आलेला घास जातो की काय अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली होती. यामुळे तोंडचे पाणी पळाले होते. बुधवारी संध्याकाळी साडे सहा ते सातपर्यंत चांगला पाऊस झाला. पिकांना जीवदान मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.