तपाेवन एक्स्प्रेसमध्ये राडा ! शेरेबाजीचा जाब विचारताच हाॅकर्सकडून प्रवाशांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 06:48 PM2021-07-10T18:48:20+5:302021-07-10T18:50:44+5:30

Tapovan express News : परतूर रेल्वेस्टेशन येताच ७ ते ८ हाॅकर्सनी प्रवाशांना मारहाण केली.

Passengers beaten by howkers when asked to respond to harassment; The video of the incident in Tapavan Express went viral | तपाेवन एक्स्प्रेसमध्ये राडा ! शेरेबाजीचा जाब विचारताच हाॅकर्सकडून प्रवाशांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल 

तपाेवन एक्स्प्रेसमध्ये राडा ! शेरेबाजीचा जाब विचारताच हाॅकर्सकडून प्रवाशांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल 

googlenewsNext
ठळक मुद्दे परतूर रेल्वेस्टेशन येण्यापूर्वी तपोवन एक्स्प्रेसमध्ये काही हाॅकर्स महिला पाहून शेरेबाजी करीत होते.असे करू नका म्हटले तर आमचे गाव येत आहे, तुम्हाला बघून घेतो, असे म्हटले.

औरंगाबाद :  तपोवन एक्स्प्रेसमध्ये महिलांना पाहून अपशब्द उच्चारण्याचा जाब विचारणाऱ्या  एका प्रवाशाला ७ ते ८ हाॅकर्सकडून मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी परतूर रेल्वेस्थानकावर घडली. याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ( Passengers beaten by howkers when asked to respond to harassment in Tapavan Express )

याप्रकरणी संजय वाघमारे यांनी फिर्याद नोंदविली आहे. परतूर रेल्वेस्टेशन येण्यापूर्वी तपोवन एक्स्प्रेसमध्ये काही हाॅकर्स महिला पाहून शेरेबाजी करीत होते.  संजय वाघमारे यांनी त्यांना असे करू नका म्हटले. तेव्हा आमचे गाव येत आहे, तुम्हाला बघून घेतो, असे म्हटले. त्यानंतर परतूर रेल्वेस्टेशन येताच ७ ते ८ हाॅकर्सनी संजय वाघमारे यांना मारहाण केली. रेल्वे सुरू झाल्यानंतर सर्व हाॅकर्स पळून गेले. 

हा प्रकार काहींनी मोबाईलमध्ये चित्रित केला. सामाजिक माध्यमावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी संजय वाघमारे यांनी नांदेड येथे फिर्याद नोंदविली. पोलीस हवलदार गडलिंगे यांनी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरवले हे करीत आहे. यात एका हाॅकर्सची ओळख पटली असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

Web Title: Passengers beaten by howkers when asked to respond to harassment; The video of the incident in Tapavan Express went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.