प्रवाशांनी स्थानक सोडून घेतला चिंंचेचा आधार

By Admin | Published: March 31, 2017 12:15 AM2017-03-31T00:15:42+5:302017-03-31T00:17:10+5:30

भोकरदन : तालुक्यात गत आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे.

The passengers left the station, the basis of the concern | प्रवाशांनी स्थानक सोडून घेतला चिंंचेचा आधार

प्रवाशांनी स्थानक सोडून घेतला चिंंचेचा आधार

googlenewsNext

भोकरदन : तालुक्यात गत आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे नेहमी बसची वाट पहात बसस्थानकात बसणाऱ्या प्रवाशांनी आता स्थानक सोडुन या परिसरातील चिंंचेच्या झाडाचा आधार घेतल्याचे चित्र आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत असल्यामुळे सकाळी १० वाजे पासूनच उन्हाची तीव्रता वाढत आहे. उन्हाचा पारा हा ४० अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे दुपारी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नेहमी नागरिकांनी गजबजले असणारे रस्ते दुपारच्या वेळी सामसुम झाल्याचे दिसत आहे. तर भोकरदन येथील बसस्थानकातून भोकरदन ते जालना, भोकरदन - औरगांबाद, भोकरदन - सिल्लोड, भोकरदन - जाफराबादसह तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, वालसांवगी, हसनाबाद, तळेगाव, सिपोरा बजार, केदारखेडा या गावातुन तालुक्याच्या ठिकाणी बसने प्रवास करणाऱ्या संख्या सुध्दा लक्षणीय आहे शिवाय संध्या साखरपुडा, विवाह, या कार्यक्रमासाठी कापड खरेदी, सोने खरेदी करणाऱ्याची गर्दी शहारात येत आहे. त्यामुळे शहरातील स्थानकात नियमित चारशे ते पाचशे प्रवसी बसच्या प्रतीक्षेत थांबलेले आसतात. मात्र गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बसस्टँडमध्ये बसणे प्रवाशांना अडचणींचे होऊ लागले आहे. त्यामुळे या बसस्थानक परिसरामध्ये असलेल्या चिंच व लिबांच्या झाडाखाली प्रवाशांची गर्दी झालेली दिसते. या ठिकाणी सावली व मोकळी हवा यामुळे उन्हाची तीव्रता कमी जाणवते.
त्यामुळे शहरातील या बसस्टॅड मध्ये दुपारच्या वेळी प्रवासी रहात नाही. ते सर्व चिंचेच्या व लिंबाच्या झाडांचा आधार घेऊन बसलेले असतात़ या ठिकाणी पाणपोई असल्यामुळे प्रवाशाना पिण्याच्या पाण्याची सुध्दा सुविधा उपलब्ध झालेली आहे़ (वार्ताहर)

Web Title: The passengers left the station, the basis of the concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.