डॉक्टरांसह रुग्णांचे जीवन तणावपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:23 AM2018-04-03T01:23:37+5:302018-04-03T16:08:24+5:30
सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर आणि रुग्ण हे दोघेही जीवनात तणावपूर्ण परिस्थितीला सामोरे जात आहेत. जीवनातील नैतिक मूल्यांचे स्मरण करून सकारात्मक, करुणशील, सहकार्य व आत्मियतेच्या भावनेतून रुग्णांच्या जीवनातील तणाव कमी करणे आवश्यक आहे. यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर घाटी रुग्णालयात झालेल्या दोनदिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर आणि रुग्ण हे दोघेही जीवनात तणावपूर्ण परिस्थितीला सामोरे जात आहेत. जीवनातील नैतिक मूल्यांचे स्मरण करून सकारात्मक, करुणशील, सहकार्य व आत्मियतेच्या भावनेतून रुग्णांच्या जीवनातील तणाव कमी करणे आवश्यक आहे. यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेतला पाहिजे, असा सूर घाटी रुग्णालयात झालेल्या दोनदिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) ३० व ३१ मार्च रोजी ‘विहासा-२०१८’ कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ‘एमजीएम’चे डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी पुणे येथील डॉ. मनोज मतनानी, मुंबईतील डॉ. सचिन परब, दिल्लीतील डॉ. रिना तोमर, डॉ. रूपारेल,नेत्रचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर, डॉ. अनिल जोशी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आध्यात्मिक दृष्टिकोनातून मानवी जीवनातील नैतिक मूल्य, सहकार्याची भावना आदी विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत डॉ. अजित दामले, डॉ. मंगला बोरकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सईदा अफरोज यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अर्चना वरे, डॉ. शोभा घोणशीकर, डॉ. वैशाली उणे, डॉ. तपन जक्कल, डॉ. कुरील, डॉ. स्नेहल येळंबकर आदींनी परिश्रम घेतले.