उपचाराअभावी चार तास रुग्ण ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:03 AM2021-03-28T04:03:57+5:302021-03-28T04:03:57+5:30
सोयगाव : तालुक्यातील जरंडी येथील कोविड केंद्र शनिवारी दुपारी अचानक पूर्ण क्षमतेने भरले. नव्याने आलेल्या चार रुग्णांना जरंडीच्या कोविड ...
सोयगाव : तालुक्यातील जरंडी येथील कोविड केंद्र शनिवारी दुपारी अचानक पूर्ण क्षमतेने भरले. नव्याने आलेल्या चार रुग्णांना जरंडीच्या कोविड केंद्रात बेड शिल्लक नसल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून तयार करण्यात आलेल्या निंबायती मदरसा कोविड केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु चार तास आरोग्य कर्मचारी न आल्याने या रुग्णांना उपचारापासून चार तास ताटकळत बसावे लागले.
ग्रामसेवकाला या रुग्णांचा सांभाळ करावा लागला होता. अखेरीस ग्रामसेवक वसंत पवार यांनी रात्री उशिरा जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी धाव घेतल्याने जरंडीच्या कोविड केंद्राचा तात्पुरता आरोग्य कर्मचारी निंबायतीला देण्यात आला होता. प्रशासनाकडून निंबायती कोविड केंद्राची पूर्वतयारी नसल्याने आरोग्य विभागाची दमछाक उडाली. आरोग्य विभागाने या कोविड केंद्रात नवीन रुग्णांना पोहचवून अखेरीस रात्री उशिरा एक आरोग्य कर्मचारी या ठिकाणी पाठविला.