ग्रामीण ५१ आरोग्य केंद्रात रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:06 AM2021-01-25T04:06:54+5:302021-01-25T04:06:54+5:30
जिल्हा परिषद : उपकरात वाढीसाठी पावले --- औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या ५१ आरोग्य केंद्रात सध्या आंतररुग्ण व बाह्यरुग्ण शुल्क ...
जिल्हा परिषद : उपकरात वाढीसाठी पावले
---
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या ५१ आरोग्य केंद्रात सध्या आंतररुग्ण व बाह्यरुग्ण शुल्क २ रुपये आकारण्यात येते. ते वाढवून ५ रुपये करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने घेतला. वाढीव शुल्कातून मिळालेली ७० टक्के रक्कम उपकरात जमा करून त्यातून देखभाल दुरुस्ती, तर ३० टक्के रक्कम रुग्ण कल्याण समितीकडे देऊन त्यातून रुग्णसेवेच्या उपाययोजना करण्यात येतील, असे या ठरावात म्हटले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने २८ डिसेंबर २०१५ रोजी बाह्यरुग्ण शुल्क १०, तर आंतररुग्ण प्रतिदिन २० रुपये आकारण्यास परवानगी दिलेली आहे. त्यानुसार हे शुल्कवाढ करून त्यातून मिळणारा निधी जिल्हा परिषद उपकरात जमा करून उत्पन्न वाढ करण्याचा आरोग्य समितीचा इरादा आहे. राज्य आरोग्य सोसायटीने जमा होणारे शुल्क रुग्ण कल्याण समितीत जमा करून ते केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खर्च करण्याचे सुचित केले आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाला शुल्कातील ७० टक्के रक्कम ही उपकरात जमा करायची आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषद प्रशासनाने सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन शुल्कवाढीच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे.