साजापूर रस्त्यावरील खड्डे बनले वाहनधारकांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 08:35 PM2019-03-27T20:35:28+5:302019-03-27T20:35:44+5:30

साजापूर ते एमआयडी दुरावस्था झाली असून, रस्त्यावर मोठ-मोठे खडे पडले आहेत

 Patients on the road of Sajapur become headaches of the drivers | साजापूर रस्त्यावरील खड्डे बनले वाहनधारकांची डोकेदुखी

साजापूर रस्त्यावरील खड्डे बनले वाहनधारकांची डोकेदुखी

googlenewsNext

वाळूज महानगर: साजापूर ते एमआयडी दुरावस्था झाली असून, रस्त्यावर मोठ-मोठे खडे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. खडड््यामुळे अपघाताच्या घटना घडत असल्याने हे खड्डे वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनले आहेत.


साजापूरकडू वाळूज एमआयडीसीत येणारा रस्ता उखडला गेला असून, रस्त्यावर खड्डे पडले आहेत. येथील एमआयडीसीच्या जलकुंभासमोरील भागात पडलेल्या खडड््यात सारखे पाणी साचत आहे. पाण्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना खडड््याचा अंदाज येत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना रात्री अपरात्री जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागत आहे. अपघताच्या घटनामुळे हा रस्ता वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनला आहे.

Web Title:  Patients on the road of Sajapur become headaches of the drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज