लातुरात परशुराम जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2016 11:22 PM2016-05-08T23:22:38+5:302016-05-08T23:42:55+5:30

लातूर : दुष्काळीजन्य परिस्थिती लक्षात घेवून यंदा लातुरात भगवान परशुराम जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली़ मिरवणुकीलाही फाटा देत सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली.

Paturam Jayanti celebrated in Latur | लातुरात परशुराम जयंती साजरी

लातुरात परशुराम जयंती साजरी

googlenewsNext


लातूर : दुष्काळीजन्य परिस्थिती लक्षात घेवून यंदा लातुरात भगवान परशुराम जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली़ मिरवणुकीलाही फाटा देत सामाजिक उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली.
परशुराम जयंतीनिमित्त रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत बार्शी रस्त्यावरील परशुराम उद्यानातील परशुराम मंदिरात यज्ञ व प्रसादाचे वाटप करण्यात आले़ त्यानंतर विवेकानंद संस्कार केंद्रात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले़ संयोजक विकास कुलकर्णी यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या शिबिराचे उद्घाटन केले. डॉ़ नितीन सास्तूरकर, पी़एमक़ुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेण्यात आले़ यावेळी जगदीश कुलकर्णी, अतुल ठोंबरे यांनी रक्तदान केले़ यावेळी परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद उदगीरकर,़ जयंत चौधरी, शंतनू ताथोडे, संजय अयाचित यांचीही उपस्थिती होती.
दुष्काळामुळे यंदा परशुराम जयंती जल्लोषात साजरी न करता साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता़ त्यामुळे मिरवणूक न काढता जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, मिरवणुकीचा खर्च जलयुक्त उपक्रमाच्या कामाला देण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Paturam Jayanti celebrated in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.