पवारांच्या ‘पॉवर’ने राष्ट्रवादी ‘वॉशआऊट’

By Admin | Published: October 22, 2014 11:27 PM2014-10-22T23:27:02+5:302014-10-23T00:16:46+5:30

राजेश खराडे , बीड विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सहा ही मतदार संघात धक्कादायक निकाल लागले आहेत. गेवराई मतदार संघात रा.कॉं. चे बदामराव पंडीत व भाजपाचे नवनिर्वाचित उमेदवार

Pawar's 'Power' Nationalist 'Washout' | पवारांच्या ‘पॉवर’ने राष्ट्रवादी ‘वॉशआऊट’

पवारांच्या ‘पॉवर’ने राष्ट्रवादी ‘वॉशआऊट’

googlenewsNext


राजेश खराडे , बीड
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सहा ही मतदार संघात धक्कादायक निकाल लागले आहेत. गेवराई मतदार संघात रा.कॉं. चे बदामराव पंडीत व भाजपाचे नवनिर्वाचित उमेदवार लक्ष्मण पवार असल्याने संबंध जिल्ह्याचे लक्ष या मतदार संघाकडे लागले होते. पक्षाच्या साथीने व पवारांच्या पॉवर ने गेल्या पंधरा वर्षापासून सत्तारुढ असलेला राष्ट्रवादी पक्षाचे मतदार संघातून वॉश आऊट केले आहे.
गेवराई या स्थानिक शहरातून पवार यांना तर मताधिक्य आहेत तर संबंध मतदार संघातील प्रत्येक गटातून तर गटातल्या जवळपास सर्व गावातूनही पवार यांना मतदारांनी पसंती दिली असल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. भाजपा व राष्ट्रवादी पक्ष सोडता इतर पक्षातील उमेदवारांना व अपक्षांना चार आकडीही मते मिळवता आलेली नसल्याचे दिसते. मततदासंघात प्रमुख पक्षांसह तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. गेवराई शहरातून लक्ष्मण पवार यांना सर्वाधिक ८७१० मते मिळाली आहेत तर त्यापाठोपाठ रा.काँ. चे बदामराव पंडित यांना ६०५३ मतांवरच समाधान मानावे लागले आहे. कॉग्रेसचे सुरेश हात्ते यांना ३६४, मनसे चे राजेंद्र मोटे यांना १०७, बसपा चे उघडे दिलीप यांना ९८ तर कम्युनिस्ट पक्षाचे भाऊराव प्रभाळे यांना शहरातून केवळ ८० मते मिळाली आहेत. शहरातून पवार यांना ४० टक्के मतदान झाले आहे तर रा़ कॉं. बदामराव पंडीत यांना २८ टक्के मतदान मिळाले आहे. मतदार संघात रा.कॉ. झिडकारून परिवर्तन घडून आणले आहे.
मादळमोही गटातही पवार प्लसमध्येच
गेवराई मतदार संघातील प्रत्येक गटातून भाजपाचे लक्ष्मण पवार यांनी आघाडी घेतलेली आहे. मादळमोही गटातीलही जवळपास सर्वच गावातून त्यांना मताधिक्य मिळाले आहे. मादळमोही गटातून यंदाच्या निवडणुकीत मताचा टक्का वाढला आहे. या वाढीव टक्क्यातील मतदारांनी भाजपाचे लक्ष्मण पवार यांना कौल दिला असल्याचे दिसत आहे. मादळमोही गटातून भाजपाला ९९२१ तर राष्ट्रवादीचे बदामराव पंडित यांना ६२२५ मते आजमाविता आलेली आहेत तर कॉग्रेसचे सुरेश हत्ते यांना ३४० व शिवसेनेचे अजय दाभाडे यांना केवळ ३५४ मते मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे सबंध गटातून भाजपाचे लक्ष्मण पवार यांना मताधिक्य मिळाले असल्याचे दिसते.

Web Title: Pawar's 'Power' Nationalist 'Washout'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.