आता घंटाभर नव्हेतर, सेकंदात वीजबिल भरणा; ऑनलाईनने बिलात सूट अन तत्काळ पोच 

By साहेबराव हिवराळे | Published: April 8, 2023 12:56 PM2023-04-08T12:56:20+5:302023-04-08T12:56:40+5:30

महावितरणने वेबसाईटवर ऑनलाइन बिल पेमेंट सुविधेसह मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे.

Pay electricity bills in seconds, not hours anymore; Online bill discount and instant delivery | आता घंटाभर नव्हेतर, सेकंदात वीजबिल भरणा; ऑनलाईनने बिलात सूट अन तत्काळ पोच 

आता घंटाभर नव्हेतर, सेकंदात वीजबिल भरणा; ऑनलाईनने बिलात सूट अन तत्काळ पोच 

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : वीजबिलात मिळणारी सवलत आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाइन भरण्यास प्राधान्य मिळत आहे. मार्च एण्डला छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील ३ लाख ५१ हजार ९५७ ग्राहकांनी ८४ कोटी ४ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे. घरबसल्या वीजबिल भरण्याकडे कल वाढता आहे.

महावितरणने वेबसाईटवर ऑनलाइन बिल पेमेंट सुविधेसह मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहण्यासाठी व भरण्यासाठी नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाइल वॉलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. महावितरणच्या आवाहनास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांचे बिल भरणा केंद्रासमोरील रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे. शहर मंडळात १ लाख ७४ हजार ३८५ ग्राहकांनी ४५ कोटी ७३ लाख, ग्रामीण मंडळात १ लाख २५ हजार ३९ ग्राहकांनी २६ कोटी ६१ लाख तर जालना मंडळात ५२ हजार ५३३ ग्राहकांनी ११ कोटी ७० लाख रुपयांचे वीजबिल ऑनलाइन भरले आहे.

बिलात ०.२५ टक्के सूट
ग्राहकांना वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट सुलभतेने करता यावे व अशा ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रेडिट कार्ड वगळता नेट बॅंकिंग, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीजबिल भरल्यास महावितरणने ग्राहकांना ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन पेमेंट केल्यास वीजबिलात ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते.

तत्काळ मिळते पोच
वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट केल्यास ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच वेबसाईटवर ‘पेमेंट हिस्ट्री’ तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाइन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

‘गो-ग्रीन’द्वारे वर्षाला १२० रुपये वाचवा
महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाइन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा १० रुपये सूट मिळते. छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिलाची सोय आहे.

Web Title: Pay electricity bills in seconds, not hours anymore; Online bill discount and instant delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.