महावितरणची जलद सेवा; ऑनलाइन बिल भरा, सव्वाटक्के सूट मिळवा

By साहेबराव हिवराळे | Published: July 22, 2023 08:23 PM2023-07-22T20:23:47+5:302023-07-22T20:25:02+5:30

याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ई-मेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरणपूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते.

Pay light bill online, get 1.25% discount | महावितरणची जलद सेवा; ऑनलाइन बिल भरा, सव्वाटक्के सूट मिळवा

महावितरणची जलद सेवा; ऑनलाइन बिल भरा, सव्वाटक्के सूट मिळवा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीज बिलाचा भरणा केला तर त्यांना जलद पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल सव्वाटक्के सवलत मिळते. हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाइटवरून असे ऑनलाइन पद्धतीने भरले, तर पावटक्के सवलत मिळते.

याखेरीज ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ई-मेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरणपूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते. शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकाने तत्पर भरणा, ऑनलाइन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हींचा वापर केला तर दरमहा किमान वीस रुपयांची म्हणजे वर्षाला २४० रुपयांची बचत होते. दोनशे युनिट वीज वापरणाऱ्यास दरमहा ३५ रुपये म्हणजे वर्षाला ४२० रुपयांची सवलत मिळते. महिना तीनशे युनिट वीज वापरणाऱ्याला दरमहा ५१ रुपयांची म्हणजेच वर्षाला ६१२ रुपयांची सवलत मिळू शकते.

१८,४८२ ग्राहकांनी बिल ऑनलाइन भरले
औरंगाबाद परिमंडळातील पर्यावरणस्नेही १८ हजार ४८२ ग्राहकांनी वीज बिल ऑनलाइन भरून २२ लाख १७ हजार ८४० रुपयांची वार्षिक बचत केली आहे.

क्रेडिट कार्डही चालते
क्रेडिट कार्डवरून भरा की डेबिटवरून; अतिरिक्त शुक्ल भरण्याची गरज नाही. क्रेडिट कार्ड व कोणत्याही ॲपवरून बिल अदा केल्यास बचत होते. वेळेच्या आत बिल भरून आर्थिक बचत होते. ऑनलाइनसाठी शुल्क लागत नाही, हे ग्राहकांनी लक्षात घ्यावे.

रांगेच्या त्रासातून मुक्ती
विजेची बिले ऑनलाइन भरणे आणि ती दिलेल्या मुदतीच्या आधी भरणे हे वी जग्राहकांना सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचतात आणि बिलातही सवलत मिळते. रांगेतही उभे राहावे लागत नाही.
- महावितरण अधिकारी

Web Title: Pay light bill online, get 1.25% discount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.