करोडी टोल प्लाझासाठी संपादित जमिनीचा मावेजा सुधारित दराने द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:02 AM2021-07-07T04:02:56+5:302021-07-07T04:02:56+5:30
तसेच अर्जदार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांचा अर्ज अंशत: मंजूर केला. प्रतिवादी विनोद नारायण पाटील, राजेंद्र इंदरचंद ...
तसेच अर्जदार भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांचा अर्ज अंशत: मंजूर केला. प्रतिवादी विनोद नारायण पाटील, राजेंद्र इंदरचंद मुगदिया आणि रामनाथ कचरु नवले यांना १७६७ रुपये चौरस मीटर या सुधारित दराने मावेजाचा निवाडा १५ दिवसांत घोषित करावा. उपरोक्त प्रतिवाद्यांनी मावेजाची रक्कम मिळाल्यानंतर प्रकल्प संचालक यांनी टोल प्लाझा एनएच-२११ साठी संपादित केलेल्या जमिनीच्या विकास कामात अडथळा निर्माण करु नये, असेही लवाद अधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्रतिवादी पाटील, मुगदिया आणि नवले यांची जमीन ताब्यात घेतली, मात्र त्यांना मावेजा दिला नाही. तसेच सक्षम प्राधिकारी (भूसंपादन) यांंनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी २४०० रुपये चौरस मीटर दराने मावेजा मंजूर केला होता. अर्जदार प्रकल्प अधिकारी यांच्यातर्फे ॲड. विरेंद्र साकोळकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. आनंद देशपांडे, ॲड. स्वाती मिटकर आणि ॲड. सोली परदेशी यांनी सहकार्य केले.