वाळूज महानगरात ‘श्रीं’चे शांततेत विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:04 AM2021-09-21T04:04:02+5:302021-09-21T04:04:02+5:30

: विनामिरवणुका लाडक्या बाप्पाला निरोप : लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप वाळूज महानगर : वाळूज महानगरात रविवारी मिरवणूक न ...

Peaceful immersion of 'Shree' in Waluj metropolis | वाळूज महानगरात ‘श्रीं’चे शांततेत विसर्जन

वाळूज महानगरात ‘श्रीं’चे शांततेत विसर्जन

googlenewsNext

: विनामिरवणुका लाडक्या बाप्पाला निरोप

: लाडक्या बाप्पाला भक्तिभावाने निरोप

वाळूज महानगर : वाळूज महानगरात रविवारी मिरवणूक न काढताच भाविकभक्तांनी भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत गणेश भक्तांनी कोरोनाचे संकट लवकर टळो, अशी प्रार्थना केली.

बाप्पाला निरोप देण्यासाठी रविवारी सकाळपासून गणेश भक्तांनी जय्यत तयारी केली होती. गणेश भक्तांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत साध्या पद्धतीने बाप्पाला निरोप दिला. बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, वडगाव, सिडको वाळूज महानगर, करोडी, जोगेश्वरी, घाणेगाव, साऊथसिटी, वळदगाव, पाटोदा आदी भागातील सार्वजनिक गणेश मंडळे तसेच ग्रामपंचायतींनी ठिकठिकाणी श्री गणरायाच्या मूर्तीचे संकलन केले. गणरायाची आरती केल्यानंतर जमा झालेल्या मूर्ती सजविलेल्या वाहनात ठेवण्यात आल्या. जोरदार घोषणा देत व गुलालाची उधळण करीत गणरायाच्या मूर्ती विसर्जनस्थळी नेण्यात आल्या.

बजाजनगरातील विसर्जन विहीर तसेच परदेशवाडी तलाव, घाणेगाव तलाव, वडगाव तलाव, शनि मंदिर आदी ठिकाणी भक्तिभावाने ‘श्री’चे विसर्जन करण्यात आले. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत २६ सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घरगुती जवळपास ६ ते ७ हजार तसेच १२ सार्वजनिक व जवळपास ५ हजार गणेश मूर्तींचे शांततेत विसर्जन करण्यात आले. पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, वाळूजचे निरीक्षक सचिन इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

फोटो ओळ- वाळूज महानगरात गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला.

--------------------------------

Web Title: Peaceful immersion of 'Shree' in Waluj metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.