कर्णपुरा देवीच्या दर्शनास जाणा-या पादचारी महिलेस वाळूच्या ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 06:00 PM2017-09-25T18:00:34+5:302017-09-25T18:10:50+5:30

नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या महिलेला वाळू वाहतुक करणा-या भरधाव ट्रकने चिरडले. ही भीषण घटना सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास कोकणवाडी येथील अहिल्यादेवी होळकर चौकात घडली.

The pedestrian, who went to see the Goddess Karanpura, crushed the sand truck | कर्णपुरा देवीच्या दर्शनास जाणा-या पादचारी महिलेस वाळूच्या ट्रकने चिरडले

कर्णपुरा देवीच्या दर्शनास जाणा-या पादचारी महिलेस वाळूच्या ट्रकने चिरडले

googlenewsNext

औरंगाबाद, दि. २५ : नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या महिलेला वाळू वाहतुक करणा-या भरधाव ट्रकने चिरडले. ही भीषण घटना सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास कोकणवाडी येथील अहिल्यादेवी होळकर चौकात घडली.लालमती रामाशीस पासवान (५०,रा. उस्मानपुरा येथील गुरूद्वारामागे) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुरा येथील देवीची यात्रा भरली आहे. दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सातील नऊ दिवस भाविक रात्रंदिवस देवीच्या दर्शनाठी गर्दी करतात. विशेषत: शहराच्या वेगवेगळ्या भागातून दर्शनासाठी पायी जाणा-या भाविकांची संख्या अधिक आहे. सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास लामती पासवान या अन्य नातेवाईकांसह दर्शनासाठी पायी निघाल्या होत्या.

कोकणवाडीतील अहिल्यादेवी होळकर चौकात त्या रस्ता ओलांडत असतानाच एक वाहन त्यांना वेगात येत असल्याचे दिसले यामुळे त्या परत फिरल्या. यावेळी दुसरे एका वेगात आलेल्या ट्रकने (एमएच-०४-३३५१) त्यांना चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, लालमती यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि  बेशुद्ध पडल्या. अपघाताची माहिती मिळताच वेदांतनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचा-यांनी आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

गंभीर जखमी झालेल्या लालमती यांना तात्काळ घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृत लालमती यांचे कुटुंब अनेक वर्षापासून शहरात स्थायिक आहे. त्यांच पती बांधकाम व्यवसायिक आहे. त्याच्या पश्चात पती,मुलगा,मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. 

चालकाची पोलिसांसमोर शरणागती
अपघात घडताच चालक शेख असीफ (वय २७,रा.वाळूज)ट्रक सोडून घटनास्थळावरून पळून क्रांतीचौक ठाण्यात गेला. तेथे त्याने त्याच्या हातून अपघात झाल्याचे पोलिसांना सांगितले. 
 

Web Title: The pedestrian, who went to see the Goddess Karanpura, crushed the sand truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.