मुलांचे डॉक्टर ते देशाचे केंद्रीय मंत्री : डॉ. भागवत कराड यांची उत्तुंग झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:02 AM2021-07-08T04:02:07+5:302021-07-08T04:02:07+5:30
औरंगाबादचे पेडियाट्रिक सर्जन असलेले डॉ. भागवत कराड यांनी १८ मार्च २०२० रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. १६ जुलै १९५६ ...
औरंगाबादचे पेडियाट्रिक सर्जन असलेले डॉ. भागवत कराड यांनी १८ मार्च २०२० रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
१६ जुलै १९५६ रोजी जन्मलेले डॉ. कराड हे १९७७ साली एमबीबीएस झाले. वाढदिवसाची ही जणू त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गिफ्टच मिळाली.
एप्रिल २००० ते ऑक्टोबर २००१ आणि नोव्हेंबर २००६ ते ऑक्टोबर २००७ या काळात त्यांना महापौरपद भूषवण्याचा मान मिळाला. १९९७-९८ या काळात ते उपमहापौर होते. तीनदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले.
२०१८ मध्ये डॉ. भागवत कराड हे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बनले. अद्याप या मंडळावर नव्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली नाही.
२००१ ते २००४ या काळात डॉ. भागवत कराड हे औरंगाबाद शहर भाजपचे अध्यक्ष होते. २०१० ते १३ या काळात भाजपच्या भटक्या विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१४ ते २०२० या काळात ते प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष व सचिव बनले.
चिकलठाणा लायन्स क्लब, भारतीय बाल रोग अकादमी, आएमए यासारख्या संस्थांवर त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली.