प्रलंबित संचिका; आयुक्तांमागे भुंगा
By Admin | Published: September 24, 2014 12:44 AM2014-09-24T00:44:30+5:302014-09-24T01:06:15+5:30
औरंगाबाद : विकासकामांच्या संचिकांवर आयुक्त पी.एम. महाजन यांनी अजून लक्ष दिलेले नाही.
औरंगाबाद : विकासकामांच्या संचिकांवर आयुक्त पी.एम. महाजन यांनी अजून लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नगरसेवक आयुक्तांना फोन करून आचारसंहिता संपल्यावर संचिकांवर सही करण्याची मागणी करीत
आहेत.
नगरसेवकांच्या वारंवार येणाऱ्या फोनला कंटाळून आयुक्तांनी एका अधिकाऱ्याकडे कुणाच्या कोणत्या संचिका आहेत व त्या किती महत्त्वाच्या आहेत. नगरसेवकांचे त्यासाठी का फोन येतात. याची माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
३ सप्टेंबर रोजी आयुक्तांनी पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या नियमित कामांच्या पलीकडे कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेतलेले नाही.
श्री विसर्जन विहिरींची पाहणी, एसटीपी जागांची पाहणी, रस्त्यांची व साफसफाईची पाहणी त्यांनी केली. तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांनी अजून जलश्रीचा ताबा सोडलेला नाही. त्यामुळे मनपाच्या अनेक संचिका जलश्रीवरच आहेत. ज्या संचिका सध्या येत आहेत. त्या संचिका आयुक्तांच्या स्वीय सहायकाकडे आहेत. २३ दिवसांपासून पालिकेचे काम फक्त सकाळी कार्यालय उघडणे आणि सायंकाळी ६ वा. बंद करणे. या पद्धतीने सुरू आहे.