दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:06 AM2021-01-03T04:06:11+5:302021-01-03T04:06:11+5:30
सिल्लोड : नगर परिषद, ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी पाच टक्के निधी राखीव असतो. दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी दिलाच पाहिजे, या ...
सिल्लोड : नगर परिषद, ग्रामपंचायतींमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी पाच टक्के निधी राखीव असतो. दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी दिलाच पाहिजे, या हेतूने सिल्लोड नगर परिषदेने या वर्षी दिव्यांगांना ५ लाख ८१ हजारांचा राखीव निधी वाटप केला. याच पद्धतीने नगर परिषदा, ग्रामपंचायतींनी दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या निधी द्यावा, असे आवाहन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पात्र लाभार्थींना धनादेश तसेच गरजूंना धान्य वाटप करण्यात आले.
शहरातील राम रहीम व्यापार संकुलासमोर शनिवारी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सिल्लोड, सोयगावात अत्याधुनिक कोरोना हॉस्पिटलचे काम प्रगतिपथावर असून, लवकरच त्याचे लोकार्पण होईल. कोरोना संकट दूर होताच सिल्लोडमध्ये दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे सत्तार यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देवीदास लोखंडे, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, डॉ. पाखरे, सुदर्शन अग्रवाल, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, सत्तार बागवान, कौतिक मोरे, न.प. गटनेता नंदकिशोर सहारे, डॉ. दत्तात्रय भवर, दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, विठ्ठल सपकाळ, रुउफ बागवान, रतनकुमार डोभाळ, शंकरराव खांडवे, चांद मिर्झा बेग, सुनील दुधे आदी उपस्थित होते.
--- पावणे सहा लाखांचे धनादेश ------
सिल्लोड नगर परिषदेने गेल्या वर्षी २३७ पात्र दिव्यांग लाभार्थींना ६ लाख तर शनिवारी ३३४ लाभार्थींना ५ लाख ८१ हजारांचे धनादेश वाटप केले. यासह नगर परिषदेने ४ हजार लाभार्थींना घरकुल योजना देण्याचे उद्दिष्ट आखले होते. त्याअनुषंगाने जवळपास २ हजार जणांना घरकुलाचा लाभ देण्यात आला असून, येत्या काळात शहरातील प्रत्येक बेघरास घर देण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी दिली.
--- कॅप्शन
: सिल्लोड नगर परिषदेतर्फे दिव्यांग लाभार्थींना धनादेश देताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार. सोबत उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, देवीदास लोखंडे, राजश्री निकम, किशोर अग्रवाल, डॉ. मच्छिंद्र पाखरे, सुदर्शन अग्रवाल, रघुनाथ घरमोडे आदी.