गाव ‘पाणीदार’ करण्यासाठी कोल्ही ग्रामस्थांची वज्रमूठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:36 AM2018-04-09T00:36:55+5:302018-04-09T00:37:34+5:30

तालुक्यातील कोल्ही गावात ‘तुफान आलंया’ अर्थात पाणी फाऊंडेशनच्या कामाला रविवारी सुरुवात झाली. अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोल्ही गावानेही सहभाग घेतला असून रविवारी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी स्वत: श्रमदान करून या कामाचा शुभारंभ केला.

 The people of the village are vulnerable to 'watering' the village! | गाव ‘पाणीदार’ करण्यासाठी कोल्ही ग्रामस्थांची वज्रमूठ!

गाव ‘पाणीदार’ करण्यासाठी कोल्ही ग्रामस्थांची वज्रमूठ!

googlenewsNext

मोबीन खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : तालुक्यातील कोल्ही गावात ‘तुफान आलंया’ अर्थात पाणी फाऊंडेशनच्या कामाला रविवारी सुरुवात झाली. अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोल्ही गावानेही सहभाग घेतला असून रविवारी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी स्वत: श्रमदान करून या कामाचा शुभारंभ केला. येथील कामात भारतीय जैन संघटनाही सहभागी झाली आहे. वैजापूर तालुक्यातील गावे पाणीदार करण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली असून अनेक गावात या संघटनेकडून मदत करण्यात येत आहे.
भविष्यात दुष्काळामुळे शेतकºयांवर आत्महत्येची वेळ येऊ नये, म्हणून वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावात छोटे बंधारे आणि चरांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. रविवारी कोल्ही येथील ग्रामस्थांनीदेखील स्पर्धा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.
तालुक्यात दुष्काळामुळे गेल्या चार वर्षात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. मात्र, पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी होऊन गावकºयांनी दुष्काळावर मात करण्याचा निर्धारच केला आहे. यासाठी गावकरी रात्रीचा दिवस करून श्रमदानाचे काम करत आहेत. या स्पर्धेने गावकºयांना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे. गावच्या मातीत लहान, थोर हात राबत आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी राबविण्यात येणाºया स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकविण्याचा विश्वास कोल्ही गावातील तरुण पिढीने व्यक्त केला. वैजापूर तालुक्यात दुष्काळाची तीव्रता गेल्या चार ते पाच वर्षात सातत्याने वाढतच चाललेली आहे. वैजापूरमध्ये या वर्षापासून पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गौतमचंद संचेती, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रवीण पारख, औरंगाबाद जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नीलेशकुमार पारख, वैजापूर तालुकाध्यक्ष विशाल संचेती, सुधाकर पवार, राजेश संचेती, महेश हिरण, दीपक सारडा, गौतम संचेती, संजय मालपाणी, प्रफुल्ल संचेती, परेश संचेती, सागर संचेती, दीपक संचेती, सचिन बाफना, प्रवीण संचेती, संजय भन्साळी, डॉ. बोरा, प्रल्हाद अरसूळ, दिनेश सोनवणे, अंबादास लांडगे, साई, रवी या जैन संघटनेचे हातही श्रमदानाला लागल्यामुळे गावकºयांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
दरम्यान, भर उन्हात रविवारी हजारो नागरिक या गावात उत्साहाने सहभागी झाल्याने ग्रामस्थांचा उत्साहही वाढला आहे.
गावातील लोक त्यांच्या त्यांच्या गावामध्ये भरपूर श्रमदान करणार आहेत. तरी सुध्दा श्रमदानानंतरही काही कठीण काम गावकºयांना श्रमदानाने करता येणे शक्य नाही. कारण प्रत्येक गावात माथ्यापासून पायथ्यापर्यंत काम करावे लागते.
तसेच विशिष्ट काम श्रमदानाने केल्यानंतर खडकात करावे लागणारे काम श्रमदानाने होऊ शकत नाही, असा ‘बीजेएस’चा अनुभव आहे. त्यामुळे ‘बीजेएस’ने यंत्रसामुग्री पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या ज्या गावांची मशीनमध्ये डिझेल भरण्याची तयारी असेल अशा गावांना जेसीबी, पोकलेन मशीनद्वारे काम करुन दिले जाणार आहे, असे भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गौतमचंद संचेती यांनी सांगितले.

Web Title:  The people of the village are vulnerable to 'watering' the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.