अंबाजोगाईत जलपुर्नभरणाला लोकसहभागाची जोड

By Admin | Published: May 21, 2016 11:34 PM2016-05-21T23:34:51+5:302016-05-22T00:06:03+5:30

अंबाजोगाई : दुष्काळ हीच काम करण्यासाठीची खरी संधी आहे. आलेल्या संकटावर मात करीत असे संकट पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखून

People's participation in flood relief in Ambajogai | अंबाजोगाईत जलपुर्नभरणाला लोकसहभागाची जोड

अंबाजोगाईत जलपुर्नभरणाला लोकसहभागाची जोड

googlenewsNext


अंबाजोगाई : दुष्काळ हीच काम करण्यासाठीची खरी संधी आहे. आलेल्या संकटावर मात करीत असे संकट पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखून निकामी जलस्रोतांना जीवनदान देण्याचे काम ‘आई’ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष अ‍ॅड. जयसिंग आनंदराव चव्हाण यांनी केले आहे.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून अंबाजोगाई व परिसरात असणाऱ्या जुन्या तलवातील गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरण्यास मदत होत आहे. दोन महिन्यांपूर्वी शहर व परिसरात पाणी बचतीबाबत त्यांनी जनजागृती सुरू केली. लोकसहभागातून जलसंकटावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी परिसरातील जलस्रोतांना पुनरुज्जीवन कसे मिळेल? यासाठी त्यांनी काम सुरू केले. शहरातील जोगाईवाडी तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला आहे. गाळ काढल्यास साठवण क्षमता वाढण्यास मदत होईल, या उद्देशाने मानवलोकच्या सहकार्याने आई प्रतिष्ठानने गाळ काढणीला सुुरुवात केली. आजतागायत १० हजार ट्रॅक्टर गाळ निघाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निघालेला गाळ शेतकऱ्यांना देण्यात आल्याने जमिनीही सुपीक बनण्यास मदत होणार आहे.
जोगाईवाडी तलावापाठोपाठ काळवटी साठवण तलावातील गाळ काढणीचे काम सुरू आहे. आजपर्यंत काळवटी तलावातून ५०० ट्रॅक्टर गाळ निघाला आहे.
मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने ‘बडा तालाब’ निकामी होत चालला होता. या तलावातूनही ७०० ट्रॅक्टर गाळ निघाला आहे. धनेगाव येथील मांजरा धरणातून गाळ काढण्यासाठी मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास लोहिया यांनी पुढाकार घेतला आहे. मानवलोकच्या मदतीला आई प्रतिष्ठानचे सहकार्य लाभत आहे. (वार्ताहर)

Web Title: People's participation in flood relief in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.