धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 08:46 PM2017-12-03T20:46:11+5:302017-12-03T20:46:30+5:30
औरंगाबाद : धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार रविवारी संपूर्ण राज्यभर धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला. औरंगाबाद विभागात ३० रुग्णालयांच्या वतीने ४८४७ रुग्णांची दिवसभरात तपासणी करण्यात आली.
औरंगाबाद : धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार रविवारी संपूर्ण राज्यभर धर्मादाय रुग्णालय आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला. औरंगाबाद विभागात ३० रुग्णालयाच्या वतीने ४८४७ रुग्णांची दिवसभरात तपासणी करण्यात आली.
धर्मादाय न्यास रुग्णालयातर्फे एकाच वेळी आरोग्य तपासणी मोहिम राबविण्याची ही पहिलीच वेळ ठरली. औरंगाबाद सह विभागातील जालना, परभणी व नांदेड येथे धर्मादाय रुग्णालयाच्या वतीने विविध परिसरात आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यासाठी प्रशिक्षीत डॉक्टरांपासून ते रुग्णवाहिकेपर्यंत व्यवस्था करण्यात आली होती. यासंदर्भात धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी सांगितले की, औरंगाबाद विभागाअंतर्गत औरंगाबादेत १९ रुग्णालयानी ३५२७ रुग्णांची तपासणी केली. जालना ३ रुग्णालयांनी ४२०, परभणी ५ रुग्णालयांनी ५०० तर नांदेड येथील ३ रुग्णालयांनी ४०० रुग्णांची तपासणी केली. असे ३० रुग्णालयाने ४८४७ रुग्णांची दिवसभरात तपासणी केली. औरंगाबादेत धर्मादाय रुग्णालयांच्या वतीने गावंदरी तांडा, जटवाडा. घृष्णेश्वर चौक, जाधववाडी, नारेगाव. बजाजनगर. सुलीभंजन, भिमनगर, सिडको एन-६ , सातारा. राहुलनगर बुद्धविहार जालाननगर. विजयननगर, गारखेडा. हर्सूल, महालपिंप्री. राजर्षी शाहुनगर, रामनगर. शरीफ कॉलनी, कटकटगेट. वरूड काजी. सिल्कमिल कॉलनी. माळीवाडा व बदनापुर. येथ आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
धर्मादाय न्यास रूग्णालयांमध्ये गरीब रुग़्णांवर (ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५० हजारच्या आत आहे) त्यांना मोफत तसेच दुर्बल घटकांतील रुग्णांवर (ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखच्या आत आहे) त्यांना सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार आहे. विविध शिबीराची पाहणी उपआयुक्त विवेक सोनुने यांच्यासह सहाय्यक आयुक्तांनी केली.