राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Published: September 28, 2014 12:28 AM2014-09-28T00:28:51+5:302014-09-28T01:04:31+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

People's spontaneous response to the resignation of Rajendra Darda | राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारानिमित्त काढण्यात आलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत रोहिदास महाराज भवनाजवळ कार्यकर्त्यांनी ना. दर्डा यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. ‘राजेंद्रबाबूजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है!’ या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
रोहिदासनगरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. राजेंद्र दर्डा यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. अनेक महिलांनी त्यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. हातात तिरंगी झेंडे, गळ्यात काँगे्रसचा रुमाल आणि डोक्यावर पंजाच्या टोप्या घालून शेकडो कार्यकर्ते राजेंद्र दर्डा यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. दादा कॉलनी व दत्तनगर भागात कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून राजेंद्र दर्डा यांचे स्वागत केले. ठिकठिकाणी राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेवर पुष्पवृष्टी होत असल्याने संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळच्या सत्रात रोहिदासपुरा, भवानीनगर, कैलासनगर, दत्तनगर या भागांमध्ये पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत भागातील नगरसेवक, महिला, युवक व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, कैलासनगर भागामध्ये राममंदिर परिसरातील दुर्गामाता मंडळाची आरती राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आली. दुपारच्या सत्रात संजयनगर भागात मोठ्या उत्साहात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत युवकांनी एकच जल्लोष केला. राजेंद्र दर्डा यांनी घरोघरी भेट देऊन मतदारांना पंजाला मतदान करण्याचे आवाहन केले. संजयनगर भागात अनेक महिलांनी राजेंद्र दर्डा यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. संजयनगर भागातील राजे संभाजी प्रतिष्ठान नवरात्रोत्सवाच्या देवीची आरती राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी राजेंद्र दर्डा यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जिन्सी भागातील जय हनुमान मंदिराच्या आवारात पदयात्रेचा समारोप झाला.
आज जयभवानीनगर, इंदिरानगरात पदयात्रा
औरंगाबाद पूर्वचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या प्रचारानिमित्त आज सकाळी ८.३० ते ११.३० यावेळेत पदयात्रा काढण्यात येणार आहे. वॉर्ड क्र. ७३ एएन-२, ८० राजीव गांधीनगर, ८१ जयभवानीनगर या भागात राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा निघेल.
पदयात्रेचा मार्ग असा राहील-
मायानगर- भवानी पेट्रोलपंप मुख्य रस्ता मार्गे विठ्ठल मंदिर- आदर्श कॉलनी- विवेक सोसायटी- महाजन कॉलनी, सी सेक्टर- राजीव गांधीनगर, महालक्ष्मी कॉलनी- संत तुकोबानगर- जयभवानीनगर गल्ली नं. १, २, ३, ४- १३ वी स्कीम- ५-६-७-८-९-१०-११-१२-१३.
सायंकाळी ४.३० ते ८ या वेळेत काढण्यात येणारी पदयात्रा- वॉर्ड क्र. ५१ इंदिरानगर दक्षिण व ५२ इंदिरानगर दक्षिण या भागात स्टार हॉटेल ते रहिमा मशीदच्या सर्व गल्ल्यांमधून जाणार आहे. पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: People's spontaneous response to the resignation of Rajendra Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.