अत्यावश्यक सेवांसाठी १५ पेट्रोल पंपांना २ वाजेनंतर परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:03 AM2021-06-04T04:03:57+5:302021-06-04T04:03:57+5:30

औरंगाबाद : शहरातील पेट्रोलपंप चालकांनी १५ जूनपर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी इंधन भरण्यास पेट्रोल पंप ...

Permission for emergency services at 15 petrol pumps after 2 p.m. | अत्यावश्यक सेवांसाठी १५ पेट्रोल पंपांना २ वाजेनंतर परवानगी

अत्यावश्यक सेवांसाठी १५ पेट्रोल पंपांना २ वाजेनंतर परवानगी

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील पेट्रोलपंप चालकांनी १५ जूनपर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी इंधन भरण्यास पेट्रोल पंप सुरू ठेवावेत. अत्यावश्यक सेवांसाठी पोलीस आयुक्त हद्दीतील सुमारे १५ ठिकाणच्या पेट्रोल पंपांना दुपारी २ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरू ठेवण्याची परवानगी जिल्हा पुरवठा विभागाने गुरुवारी दिली आहे.

पंपावर इंधन वितरण करताना पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करून इंधन द्यावे. इंधन देणारे आणि घेणाऱ्यांना मास्क सक्तीचे करावे. मास्क नसल्यास इंधन देऊ नये. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी दिला आहे.

हे पेट्रोलपंप दुपारी २ वाजेनंतर राहणार सुरू

कोको पेट्रोल पंप, जळगाव टी पॉइंट, हर्सूल,

एन.ए. प्रिंटर पेट्रोल पंप, महावीर चौक,

हिंद सुपर पेट्रोल पंप, क्रांती चौक,

एन.ए. प्रिंटर, पेट्रोल पंप, दिल्ली गेट,

पोलीस आर ओ, पेट्रोल पंप, टी. व्ही. सेंटर,

पोलीस आर ओ, पेट्रोल पंप, चिकलठाणा

अंबरवाडीकर एंटरप्रायजेस, पेट्रोल पंप, सेव्हन हिल,

लोळगे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, बन्सीलालनगर

जानकी सर्वो ऑटोमोबाईल्स पेट्रोल पंप, मुकुंदवाडी,

जागृत पेट्रोलियम पेट्रोल पंप, सेव्हन हिल,

इसारवाडी हायवे, पेट्रोल पंप, पैठण रोड,

नर्मदा ऑटो, पेट्रोल पंप, बीड बायपास,

रामकृष्ण पेट्रोल पंप, बीड बायपास,

एस गिरिजा समर्थ, पेट्रोल पंप, शरणापूर फाटा,

औद्योगिक वसाहतीतील व औरंगाबाद-नगर हायवे वरील पेट्रोल पंप

वाळूज, बजाजनगर, पंढरपूर व इतर औद्योगिक वसाहतील पंप.

Web Title: Permission for emergency services at 15 petrol pumps after 2 p.m.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.