त्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेस परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:05 AM2021-01-21T04:05:06+5:302021-01-21T04:05:06+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बंधनांचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधिताना दिल्या आहेत. ---------- लसीकरणानंतर होणाऱ्या त्रासाची भीती बाळगू नका औरंगाबाद ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बंधनांचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधिताना दिल्या आहेत.
----------
लसीकरणानंतर होणाऱ्या
त्रासाची भीती बाळगू नका
औरंगाबाद : कोविड प्रतिबंधात्मक उपायांमध्ये लसीकरण महत्त्वाचे आहे. कोविड लसीकरणानंतर होणारा त्रास हा प्राथमिक स्वरूपाचा असून, कोणत्याही लसीकरणानंतर काही लोकांना अशा प्रकारचा त्रास होण्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे लसीकरणाबाबत कुणीही कोणतीही शंका बाळगू नये. यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेत लसीकरण मोहीम यशस्वी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्ह्यात मोहीम यशस्वी करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बुधवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात लसीकरण मोहिमेंतर्गत केलेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. बैठकीस जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. मुजीब, डॉ. एम. आर. लढ्ढा यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते. यावेळी लसीकरण अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी लस घेतल्यानंतर ज्या-ज्या लोकांना त्रास झाला आहे तो त्रास सौम्य स्वरूपाचा असून, उपचारानंतर सर्वांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे सांगितले.