जोगेश्वरीत विवाहितेचा चारित्र्यावर संशय घेऊन छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:06 AM2021-09-09T04:06:02+5:302021-09-09T04:06:02+5:30

:सासरच्या ७ जणाविरुध्द गुन्हा जोगेश्वरीत विवाहितेचा चारित्र्यावर संशय घेऊन छळ, ७ जणांविरुद्ध गुन्हा वाळूज महानगर : जोगेश्वरीतील २१ वर्षीय ...

Persecution of a married woman in Jogeshwari on suspicion of her character | जोगेश्वरीत विवाहितेचा चारित्र्यावर संशय घेऊन छळ

जोगेश्वरीत विवाहितेचा चारित्र्यावर संशय घेऊन छळ

googlenewsNext

:सासरच्या ७ जणाविरुध्द गुन्हा

जोगेश्वरीत विवाहितेचा चारित्र्यावर संशय घेऊन छळ, ७ जणांविरुद्ध गुन्हा

वाळूज महानगर : जोगेश्वरीतील २१ वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन १ लाखासाठी छळ करणाऱ्या सासरच्या ७ जणाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुनीता गजानन राठोड (रा. रांजणगाव) हिचे अडीच वर्षांपूर्वी गजानन राठोड याच्यासोबत लग्न झाले. लग्नानंतर महिनाभरातच गजानन राठोड याने दारूच्या नशेत पत्नी सुनीता हीस शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरवात केली. सुनीता हिचे सासू-सासरे व चार नणंदाही तिला सतत टोमणे मारून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. गजानन याने माहेरहून १ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून पत्नी सुनीता हिचा सतत छळ सुरू करुन तिला घराबाहेर हाकलून दिले. सासरच्या मंडळीकडून सतत सुरू असलेल्या या छळाला कंटाळून सुनीता राठोड यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन पती गजानन राठोड, सासरे सुखलाल राठोड, सासू शशीकला राठोड, नणंद सरस्वती चव्हाण, लक्ष्मी पवार, अर्चना पवार व शिल्पा चव्हाण या ७ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--------------------------

पत्नीच्या मृत्युस कारणीभुत पतीविधरुद गुन्हा दाखल

वाळूज महानगर : निष्काळजीपणे दुचाकी चालवुन पत्नीच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याप्रकरणी पतीविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काशीनाथ गोपीनाथ पंडीत (रा. पारिजातनगर, म्हाडा कॉलनी) हे दिड महिन्यापुर्वी २१ जुलैला दुचाकी (क्रमांक एम.एच.२०, ए.क्यु.१९९५)वर पत्नी सुनिता पंडीत यांना सोबत घेऊन पंढरपूरातुन तीसगावच्या दिशेने चालले होते. या मार्गावरुन जात असताना सिडको वाळूजमहानगर-१ जवळ दुचाकी स्लीप होऊन काशीनाथ पंडीत व सुनिता पंडीत हे दोघे जखमी झाले होते. या अपघातात सुनिता पंडीत यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच दिवशी सुनिता याचा मृत्यु झाला. पोलिस तपासात काशिनाथ पंडीत यांनी निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने हा अपघात होऊन सुनिता यांचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोहेकॉ. दशरथ खोसरे यांच्या फिर्यादीवरुन काशिनाथ पंडीत याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Persecution of a married woman in Jogeshwari on suspicion of her character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.