‘पेट‘ संबंधीची याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:04 AM2021-02-20T04:04:27+5:302021-02-20T04:04:27+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेच्या (पेट) पहिल्या पेपरप्रमाणे दुसरा पेपर घरुन देण्याचा निर्णय घ्यावा, ...

Petition related to 'stomach' rejected | ‘पेट‘ संबंधीची याचिका फेटाळली

‘पेट‘ संबंधीची याचिका फेटाळली

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेच्या (पेट) पहिल्या पेपरप्रमाणे दुसरा पेपर घरुन देण्याचा निर्णय घ्यावा, यासंबंधीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली.

विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेचा ऑनलाईन पहिला पेपर ३० जानेवारी रोजी घेतला होता. त्यानंतर या पेपरमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याच्या काही तक्रारी विद्यापीठात प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ‘पेट’चा दुसरा पेपर ऑनलाईन पद्धतीनेच; परंतु तो घरुन देण्याऐवजी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात जावून द्यावा, असा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला. त्यास मोहम्मद यासीन व अतुल राजेंद्र कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. ‘पेट‘चा दुसरा पेपर पहिल्या पेपरप्रमाणे घरुन घेण्यासाठी विद्यापीठाला आदेशित करावे, असे याचिकेत म्हटले होते. यावर विद्यापीठाने न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे स्पष्ट केले की, ‘कोविंड’ संदर्भात शासनाच्या निर्णयाप्रमाणे सर्वोतोपरी उपायोजना करुनच सदर परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर या परीक्षा प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत खंडपीठाने याचिका निकाली काढली. विद्यापीठाच्या वतीने अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले. त्यांना विधि अधिकारी किशोर नाडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Petition related to 'stomach' rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.