पेट्रोल @ १००.१७; औरंगाबादमध्ये पेट्रोल दराने ओलांडले शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 02:01 PM2021-05-17T14:01:14+5:302021-05-17T14:03:29+5:30
पेट्रोल व डिझेलचे दर वाढणे म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणे आहे.
औरंगाबाद : अखेर औरंगाबादकरांना एक लिटर पेट्रोलसाठी रविवारी १०० रुपये १७ पैसे मोजावे लागले. पॉवरपाठोपाठ साध्या पेट्रोलनेही रविवारी शंभरी गाठली, तर डिझेल दरानेही शतकाकडे वाटचाल सुरू असून, आता शंभरी गाठायला अवघे ८ रुपये ३१ पैसे बाकी आहेत.
महागाईने सर्वसामान्यांना चोहोबाजूने घेरले आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढणे म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढणे आहे. शनिवारी पेट्रोल ९९ रुपये ८८ पैसे प्रतिलिटर विकले गेले होते. रविवारी सकाळी जेव्हा वाहनधारक पेट्रोलपंपावर पोहचले तेव्हा त्यांना काही पंपांवर १०० रुपये ०३ पैसे, तर काही पंपावर १००.१७ पैसे असा आकडा मीटरवर दिसून आला. डिझेलचे भाव मागील १५ दिवसांत प्रतिलिटर २.७४ रुपयांनी वाढून रविवारी ते ९१.६९ रुपये प्रतिलिटर विक्री झाले.
तारीख पेट्रोल डिझेल (प्रतिलिटर)
१ मे २०२० ९७.९७ रु ८८.९५ रु
८ मे २०२० ९८.९१ रु ९०.१७ रु
१२ मे २०२० ९९.६६ रु ९१.०५ रु
१५ मे २०२० १००.१७ रु ९१.६९ रु