पेट्रोल डिझेल दर गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:02 AM2021-01-20T04:02:07+5:302021-01-20T04:02:07+5:30
चौकट मालवाहतूक भाडे वाढले पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने मालवाहतूकदारांनी गाडी भाडे १० ते १५ टक्क्याने वाढविले आहे. त्यामुळे धान्य, ...
चौकट
मालवाहतूक भाडे वाढले
पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने मालवाहतूकदारांनी गाडी भाडे १० ते १५ टक्क्याने वाढविले आहे. त्यामुळे धान्य, डाळी, तांदळाचे भाव क्विंटलमागे १५ ते २० रुपयांनी वाढले आहेत. डिझेलच्या भावात आणखीन वाढ झाली तर महागाई जास्त वाढेल. शेतकरी आता तूर, शिल्लक मका बाजारात आणत आहेत. लोडिंग रिक्षा, ट्रॅक्टर, टेम्पोवाल्यांनी गाडीभाडे वाढविले आहे.
---
पेट्रोल- डिझेलचे भाव
महिना वर्ष -पेट्रोल -डिझेल
(प्रति लिटर)
१८ जानेवारी २०१७ -७६.७९ रू -६४.२१ रू
१८ जानेवारी २०१८ -८०.३६ रू -७५.८८ रू
१८ जानेवारी २०१९ -७७.३३ रू - ६७.६९ रू
१८ जानेवारी २०२० - ८१.९४ रू -७३.०४ रू
१८ जानेवारी २०२१ -९२.७७ रू -८३.०८ रू