...तर कर्नाटकप्रमाणे कोल्हापुरात पेट्रोल दर
By Admin | Published: July 9, 2017 12:14 AM2017-07-09T00:14:52+5:302017-07-09T00:14:52+5:30
राज्याने कर रद्द करावा : पेट्रोलियम डीलर्सची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
देगलूर : बऱ्याच वर्षानंतर तालुक्यात वेळेवर झालेल्या पेरण्या, बाद न होता उगवलेले चांगले मोड पण पेरणीनंतर पावसाने दिलेली हुलकावणी, त्यामुळे दुबार पेरणीचे शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेले संकट बघता तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी धावपळ चालू केली आहे.
आ़सुभाष साबणे यांनी विकास कामे काय केली, या विषयावर जनतेत वेगवेगळी मते असली तरी आ. साबणे यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी प्रवृत्त केले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. सन २०१७-१८ सालाचा पीकविमा शेतकऱ्यांनी भरावा यासाठी मार्गदर्शन म्हणून कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती रक्कम भरावी यासाठी आमदारांनी शहरातील मुख्य चौकात बॅनर लावून शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी आवाहन केले आहे. २०१५-१६ मधील तालुक्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा पीकविमा ५७ कोटी रुपये तर रबी पिकाचा विमा १३ कोटी रुपये असे एकूण ७० कोटी रुपये यावर्षी शेतकऱ्यांना मिळाले आहेत. तसेच चालूवर्षी पावसाने मागील १२ दिवसांपासून दडी मारल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पावसाची अशीच अवकृपा राहिल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर अटळ आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा भरण्यासाठी धावपळ चालू केली आहे.
पीकविमा भरण्याचा फार्म घेवून भरून ठेवण्यात येत आहे़ ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे पण त्यांच्याजवळ पासबुक नाही असे शेतकरी बँकेत जाऊन पासबुक घेत आहेत. एवढेच नव्हे, तर तलाठ्याकडे जाऊन सातबारा व पीक पेरा घेण्यासाठी जात आहेत़ मात्र पीक पेऱ्यासाठी थोडे थांबण्याचे तलाठी शेतकऱ्यांना सांगत आहेत़ यासंबंधी तहसीलदार महादेव किरवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागेल त्या शेतकऱ्यांना सातबारा व पीकपेरा संबंधित गावाचे तलाठी देतील त्यात कसलीही अडचण रहाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र बँक पीकविमा केव्हापासून घेण्यास प्रारंभ करेल हे मात्र स्पष्ट झाले नाही.
एकंदरीत पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ बघता पीक विमा भरताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी बँकेसमोर होणार हे निश्चित आहे.