उत्तर प्रदेशातून एक फोन कॉल आला अन दहा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा सापडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 03:36 PM2021-08-11T15:36:07+5:302021-08-11T15:42:35+5:30

missing boy was found after ten years : क्रांतीनगर येथील रहिवासी रोहित उर्फ सोनुल्या २०११ साली अचानक घरातून निघून गेला होता.

A phone call came from Uttar Pradesh and a missing boy from Aurangabad was found after ten years | उत्तर प्रदेशातून एक फोन कॉल आला अन दहा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा सापडला 

उत्तर प्रदेशातून एक फोन कॉल आला अन दहा वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा सापडला 

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस नियंत्रण कक्षाला उत्तर प्रदेशातील दुधमंडी येथील एका तरुणाने फोन कॉल केला येथील एका रेल्वेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याच्या घरी तरुण कामाला असल्याची माहिती दिली.

औरंगाबाद : १० वर्षांपूर्वी औरंगाबादमधून हरवलेला गतिमंद मुलगा ( Missing Boy ) आज त्याच्या वयाच्या २१ व्या वर्षी उत्तर प्रदेशात सापडला. क्रांती चौक पोलिसांनी त्याला आज उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh ) येथे आणून त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले. रोहित उर्फ सोनुल्या गजू नाथभजन असे या तरुणाचे नाव आहे. ( A phone call came from Uttar Pradesh and a missing boy from Aurangabad was found after ten years )

प्राप्त माहितीनुसार क्रांतीनगर येथील रहिवासी रोहित उर्फ सोनुल्या २०११ साली अचानक घरातून निघून गेला होता. याविषयी त्याच्या नातेवाइकांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तेव्हापासून क्रांती चौक पोलीस आणि त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. त्याच्या छायाचित्रासह माहिती विविध राज्यांतील पोलिसांना पाठविली होती. मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा पोलिसांना मिळत नव्हता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी औरंगाबाद ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला उत्तर प्रदेशातील दुधमंडी येथील एका तरुणाने फोन कॉल करून औरंगाबादेतील गतिमंद २१ वर्षांचा तरुण रेल्वेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याच्या घरी कामाला असल्याची माहिती दिली. त्या तरुणाने त्याची एक व्हिडीओ क्लिप तयार करून ग्रामीण पोलिसांना पाठविली. 

ग्रामीण पोलिसांनी शहर पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. शहर पोलिसांनी केलेल्या तपासणीत क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २०११ साली हरवलेला रोहित उर्फ सोनुल्या नाथभजन हा असल्याचे समजले. यानंतर पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शरद देशमुख हे तीन दिवसांपूर्वी रोहितच्या नातेवाइकांना सोबत घेऊन उत्तर प्रदेशमधील दुधमंडी (ता. भरथाना, जि. इटावा) येथे गेले. तेथील पोलिसांच्या मदतीने दुधमंडी येथील एका घरावर छापा टाकून रोहितला ताब्यात घेतले आणि आज औरंगाबादेत आणले.

Web Title: A phone call came from Uttar Pradesh and a missing boy from Aurangabad was found after ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.