१४ लाखांचे कॅमेरे घेऊन छायाचित्रकार बेपत्ता;फसवणुकीचा गुन्हा ही दाखल झाल्याने गूढ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 01:36 PM2022-01-04T13:36:26+5:302022-01-04T13:42:16+5:30

पुंडलिकनगर ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार आधीच दाखल असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

Photographer who took 14 lakh cameras for pre-wedding shoot goes missing, fraud case also registered | १४ लाखांचे कॅमेरे घेऊन छायाचित्रकार बेपत्ता;फसवणुकीचा गुन्हा ही दाखल झाल्याने गूढ वाढले

१४ लाखांचे कॅमेरे घेऊन छायाचित्रकार बेपत्ता;फसवणुकीचा गुन्हा ही दाखल झाल्याने गूढ वाढले

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील सात छायाचित्रकारांचे महागडे कॅमेरे घेऊन अलिबाग येथे प्रीवेडिंग व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी गेलेल्या युवकाच्या विरोधात १४ लाख ५५ हजार ६४० रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल झाला. विशेष म्हणजे, ज्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला, तो युवक बेपत्ता असल्याची तक्रार एक दिवस आधी पुंडलिकनगर ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विशाल वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, योगेश रतन गोत्राळ (वय २७, रा. गजानननगर, पुंडलिकनगर) यास अलिबाग येथे लग्नाच्या व्हिडीओ शूटिंगची मोठी ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी त्याने छायाचित्रकार विशाल वाघमारे यांच्या १ लाख ३५ हजार रुपयांच्या कॅमेऱ्यासह गजानन कचरू वेळंजकर यांचा ३ लाख ४० हजाराचा, सूरजकुमार मनोज इंगळे यांचा ४ लाख ४ हजारांचा, सोहेल शहा हुसेन शहा यांचा १ लाख ६७ हजार ६४० , श्रेयस लक्ष्मीकांत बुजाडे यांचा ७९ हजारांचा, गजेंद्र बाबूराव मते यांचा १ लाख ६० हजारांचा, राहुल विजय पवार यांचा १ लाख ७० हजार रुपयांचा कॅमेरा दीड ते तीन हजार रुपये प्रति दिवस भाडेतत्त्वावर घेऊन गेला होता. २४ डिसेंबरला नेलेले हे कॅमेरे १ जानेवारी रोजी परत आणून देण्याची बोली होती. मात्र ३ जानेवारीपर्यंत १४ लाख ५५ हजार ६४० रुपये किमतीचे कॅमेरे परत आणून देण्यात आले नाहीत. आरोपी योगेशसह फिर्यादी आणि इतर सर्वजण एकमेकांचे मित्र आहेत. योगेशवर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली.

योगेशच्या भावाचीही तक्रार
तथापि, योगेश ३० डिसेंबर रोजी घरातून निघून गेल्याची तक्रार त्याचा भाऊ नीलेश याने पुंडलिकनगर ठाण्यात २ जानेवारी रोजी नोंदविली. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

Web Title: Photographer who took 14 lakh cameras for pre-wedding shoot goes missing, fraud case also registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.