औरंगाबाद जिल्ह्यातील ६६ डॉक्टरांचे रोखले भत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:25 AM2018-04-08T00:25:08+5:302018-04-08T00:26:32+5:30
आरोग्य केंद्रांमध्ये चोवीस तास रुग्णसेवा देणे बंधनकारक असतानादेखील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी थांबत नाहीत. यासंबंधी प्राप्त तक्रारीनुसार चौकशी केली असता जिल्ह्यातील ११२ पैकी ६६ वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आरोग्य केंद्रांमध्ये चोवीस तास रुग्णसेवा देणे बंधनकारक असतानादेखील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी थांबत नाहीत. यासंबंधी प्राप्त तक्रारीनुसार चौकशी केली असता जिल्ह्यातील ११२ पैकी ६६ वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले. त्यामुळे त्यांचा घरभाडे भत्ता रोखण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.
पीरबावडा उपकेंद्रामध्ये २२ मार्च रोजी एक महिला प्रसूतीसाठी गेली. तेव्हा तेथे कार्यरत तीन आरोग्य सहायिका व दोन आरोग्य सेवक उपस्थित नव्हते. त्या महिलेला वेळेवर आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे ती बाहेरच प्रसूत झाली.
हे प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर यांनी गांभीर्याने घेतले. या प्रकरणात एक जण निलंबित, तर उर्वरित ६ जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने तालुका आरोग्य अधिकारी हे त्या- त्या तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे संनियंत्रण अधिकारी असतात. कोणते कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी गैरहजर आहेत, याबाबतचा अहवाल त्यांनी ‘डीएचओ’ कार्यालयास सादर करायला पाहिजे.
यापुढे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांना १ एप्रिलपासून बायोमेट्रिक मशीनद्वारे हजेरी नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. जेथे नादुरुस्त बायोमेट्रिक मशीन असतील, त्या दुरुस्त करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बायोमेट्रिक मशीनच्या हजेरीची जे अधिकारी, कर्मचारी अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना एप्रिल महिन्याचे वेतन देऊ नये, अशा स्पष्ट सूचना आरोग्य संचालनालयाने दिल्या आहेत. गैरहजर डॉक्टरांबाबत ‘ड्यूटी पे’ हा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारसावंगी आणि लोणी येथे आठवड्यातून केवळ तीनच दिवस सेवा बजावणाºया वैद्यकीय अधिकाºयांचे केवळ १२ दिवसांचे वेतन काढण्यात आले आहे.
डॉक्टरांविरुद्ध कडक कारवाई
जिल्ह्यात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे व २७९ उपकेंद्रे असून, त्यामध्ये ११२ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाºया ११ वैद्यकीय अधिकाºयांचा ‘एनपीए’ बंद करण्यात आला आहे.
दूरध्वनीच्या १०४ क्रमांकावर प्राप्त तक्रारींची खातरजमा केल्यानंतर १२ वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे.
मुख्यालयी न राहणाºया ६६ वैद्यकीय अधिकाºयांचा घरभाडे भत्ता बंद करण्यात आला आहे. तीन वैद्यकीय अधिकाºयांच्या वेतनवाढी रोखल्या आहेत. ९ वैद्यकीय अधिकाºयांची विभागीय चौकशी सुरू आहे.
तक्रारीवरून ३ वैद्यकीय अधिकाºयांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्याचा प्रस्ताव आरोग्य संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले.