पिंपळाच्या पानावर रांगोळीतून साकारले बुद्धांचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:04 AM2021-05-26T04:04:11+5:302021-05-26T04:04:11+5:30
औरंगाबाद : संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर श्री. शंकरसिंग नाईक हायस्कूलमधील कलाशिक्षक ...
औरंगाबाद : संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर श्री. शंकरसिंग नाईक हायस्कूलमधील कलाशिक्षक राजेश निंबेकर यांनी पिंपळाच्या पानावर रांगोळीच्या माध्यमातून गौतम बुद्धांची रांगोळी रेखाटत अभिवादन केले आहे. पिंपळाच्या पानावर गौतम बुद्धांची रांगोळी रेखाटण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग असून, ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये या उपक्रमाची नोंद घेतली गेल्याचे डॉ. दिनेश गुप्ता यांनी कळविले आहे. तीन तासांत ३५ ग्रॅम रांगोळीच्या माध्यमातून ही रांगोळी रेखाटण्यात आली आहे.
सध्या संपूर्ण जगभर कोरोना महामारीचे सावट असताना ज्या बोधिवृक्षाखाली बसून गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, त्या पिंपळाच्या पानावर राजेश निंबेकर यांनी गौतम बुद्धांची रांगोळी रेखाटली आहे. राजेश निंबेकर यांनी यापूर्वीही विविध महामानवांचे फलक लेखन, पोट्रेट रांगोळी काढून समाजप्रबोधन केले आहे. नुकत्याच त्यांच्या रांगोळी कलेची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या यशाबद्दल कमला नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बिपीन नाईक, सचिव बाबूराव नालमवार, मुख्याध्यपिका सुलभा वट्टमवार यांच्यासह सर्व क्षेत्रांतून त्यांचे स्वागत होत आहे.